thane criminal

ठाण्याच्या(thane) वारीमाता गोल्ड ज्वेलर्स (gold jewelers robbery)दुकानाची भिंत तोडून तब्बल १ कोटी ३७ लाख २ हजार १०० रुपयांचे दागिने घेऊन आरोपींची पोबारा केला.ही घटना यावर्षी १६ जानेवारीला मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    ठाणे : ठाण्याच्या(thane) वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारीमाता गोल्ड ज्वेलर्स (gold jewelers robbery)दुकानाची भिंत तोडून तब्बल १ कोटी ३७ लाख २ हजार १०० रुपयांचे दागिने घेऊन आरोपींची पोबारा केला.ही घटना यावर्षी १६ जानेवारीला मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे.

    या गुन्ह्याचा तपास परिमंडळ ५ चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. याबाबत परिमंडळ अंतर्गत पोलीस ठाण्यांना माहिती करण्यात आले होते. दरम्यान कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार याना गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून वपोनि खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपी सुटं आबूल शेख(२९) रा. मिमाईटोला, पो. पियारपूर, जि -साहेबगंज झारखंड, आरोपी अब्दुल भादू शेख हक (३४) भादू शेख उत्तर पियारपूर राधानगर जि -साहेबगंज झारखंड आणि आरोपी आलमगीर जब्बार शेख(३३) रा. बालटोला, पो-पियारपूर, राधानगर , जि -साहेबगंज येथून आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांना विमानाने आणण्यात येणार आहे.

    आरोपींना आणण्यासाठी कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली टीम बनवून आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांचा सादर गुन्ह्यात सक्रिय सहभाग असलयाचे समोर आले. तर दुसरीकडे पोलीस तपासात पुणे परिसरातील जेवेलर्स शॉप फोडून रात्रीच्या वेळी चोरी करण्यासाठी आले होते अशी माहिती समोर आली . या प्रकरणाचा पुढील तपास वर्तकनगर पोलीस करणार आहेत.