crpf jawan saved life

चुकीच्या मेल एक्स्प्रेसमध्ये चढल्याचे लक्षात येताच चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात असलेली गर्भवती महिला(Kalyan Railway Station) फलाटावर पडली. फलाट आणि ट्रेनच्या मधल्या पोकळीत अडकणार इतक्यात रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान(RPF Jawan Saved Life Of Pregnant woman) एस. आर. खांडेकर यांनी प्रसंगावधान दाखवले.

    कल्याण : चुकीच्या मेल एक्स्प्रेसमध्ये चढल्याचे लक्षात येताच चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात असलेली गर्भवती महिला(Kalyan Railway Station) फलाटावर पडली. फलाट आणि ट्रेनच्या मधल्या पोकळीत अडकणार इतक्यात रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान(RPF Jawan Saved Life Of Pregnant woman) एस. आर. खांडेकर यांनी प्रसंगावधान दाखवले. स्वतःचा जीव धोक्यात घालून या महिलेला बाहेर खेचले. स्वतःचा जीव धोक्यात घालून आरपीएफ जवानाने महिलेला वाचवल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

    ही घटना सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातील ४ नंबर फलाटावर घडली. चंद्रेश नावाचा प्रवासी आपला छोटा मुलगा आणि ८ महिन्याच्या गर्भवती पत्नीं समवेत गोरखपूर एक्स्प्रेसची प्रतीक्षा करत कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर थांबला होता. या दरम्यान स्थानकात दुसरी मेल सिग्नल नसल्याने थांबविण्यात आली होती. मात्र चंद्रेशला ती गोरखपूर एक्स्प्रेस असल्याचा समज झाल्याने तो आपल्या कुटुंबासह त्या गाडीत चढला. मात्र ही गोरखपूर एक्स्प्रेस नसल्याचे लक्षात येताच त्याने गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत गाडी सुरू झाली होती.

    चंद्रेश गाडीतून उतरला मात्र गाडीतून उतरण्याचा प्रयत्नांत त्याची ८ महिन्याची गर्भवती पत्नी फलाटावर पडली आणि मेल आणि फलाटाच्या मधल्या पोकळीत घसरली. ती गाडी खाली जात असल्याचे पाहून फलाटावर ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवान खांडेकर यांनी तत्काळ धाव घेत तिला फलाटावर खेचून घेत तिचा जीव वाचवला. खांडेकर यांनी प्रसंगावधान दाखवत एकाच वेळी दोन जीव वाचवल्या बद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.