challan for bike

वाहतूक पोलिसांना (traffic police)यंत्राने स्मार्ट केले असले तरी मानवी चुकीचा(mistake by rto officer) फटका मात्र नाहक इतरांना बसायला लागला आहे. असाच काहीसा प्रकार रविवारी नवी मुंबईतील(navi mumbai) जुईनगर येथील तरुणाच्या बाबतीत घडला.

    नवी मुंबई : सध्या वाहतूक विभागदेखील(RTO) अपग्रेड झाला आहे. पूर्वीसारखी पावती पुस्तके हातात न घेता आता फोटो काढून ॲपवार टाकताच ऑनलाईन दंड नियम मोडणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर पाठवण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. वाहतूक पोलिसांची दगदग वाचली असली तरी यातून नजरचुकीने समस्यादेखील निर्माण होऊ लागल्या आहेत. वाहतूक पोलिसांना यंत्राने स्मार्ट केले असले तरी मानवी चुकीचा फटका मात्र नाहक इतरांना बसायला लागला आहे. असाच काहीसा प्रकार रविवारी नवी मुंबईतील जुईनगर येथील तरुणाच्या बाबतीत घडला.

    जुईनगर येथे राहणाऱ्या आदेश तळेकरांना अचानक मोबाईलवर वाहतूक विभागाचा संदेश प्राप्त झाला. ती लिंक उघडताच त्यांना धक्काच बसला. वाहतूक नियम मोडल्याबद्दल त्यांना २०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांकडून आकरण्यात आला होता. त्यामुळे आदेश काहीसा चक्रावून गेला. रविवार असल्याने दिवसभर घरात असल्याने दुचाकी देखील घराजवळ उभी आहे. असे असताना दंड कसा काय ठोठावला गेला असा प्रश्न त्याला पडला. मात्र चलन नीट निरखून पाहता त्यातील वाहतूक पोलिसांची चूक लक्षात आली.

    वाहतूक पोलिसांकडून नियम तोडणाऱ्याच्या मोबाईलवर चलन व वाहनाचा फोटो देखील पाठवण्यात येतो. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करताच आदेश यांना धक्का बसला. त्यातील फोटो हा दुसऱ्या वाहनाचा दिसून आला. वाहनाच्या नंबरच्या एका आकड्यावरून गोंधळ झाल्याचे व त्याचा फटका आदेश तळेकर याला बसल्याचे दिसून आले आहे.

    आदेश तळेकर यांच्या दुचाकीचा नंबर एमएच ४३ एक्यू ६९३६ असा आहे. तर ज्या व्यक्तीला दंड ठोठावला आहे. ती दुचाकी पनवेल भागातील असून त्या दुचाकीचा नंबर एमएच ४६ एक्यू ६९३६ असा आहे. मात्र ज्या वाहतूक पोलिसाने पनवेलच्या दुचाकीस्वारास अडवून नियम मोडल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. त्या वाहतूक पोलिसाने वाहनाचा फोटो काढल्यावर नंबर टाकताना ४६ च्या ऐवजी ४३ टाकल्याने राविवारी सुट्टीनिमित्त घरी अराम करणाऱ्या आदेश यांच्या नावावर चलन फाडले गेले. ही घटना फक्त नंबर नोंद करण्यात झालेल्या एका आकड्याच्या चुकीने घडली. आतापर्यंत असे नाहक भुर्दंड चूक नसताना कितीजणांना बसले असावेत असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.