db patil airport

मुख्य कृती समितीच्या सभेत ठरल्याप्रमाणे आगामी काळात रायगड, ठाणे, पालघर,  मुंबई या चारही जिल्ह्यातील तालुकानिहाय दि. बा. पाटील समर्थक असलेल्या आगरी, कोळी, भंडारी, कऱ्हाडी, आदिवासी बांधवांच्या सभा तालुकानिहाय होणार आहेत. जेणेकरून येत्या १३ जानेवारी २०२२  रोजी स्वर्गीय दि. बा. पाटील(D B Patil) यांच्या जयंतीचा कार्यक्रम भव्य करून पुन्हा एकदा विमानतळ नामकरणसाठी(Protest For Name Change) शासनाचे लक्ष वेधणार आहे.

    नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ(Navi Mumbai International Airport) नामकरण लढ्याची भूमीपुत्रांची लढाई(Protest For Name Change Of Navi Mumbai Airport) अविरतपणे सुरूच आहे. मागील १८ नोव्हेंबर रोजी पनवेल (Panvel)येथे पार पडलेल्या मुख्य कृती समितीच्या सभेत ठरल्याप्रमाणे आगामी काळात रायगड, ठाणे, पालघर,  मुंबई या चारही जिल्ह्यातील तालुकानिहाय दि. बा. पाटील समर्थक असलेल्या आगरी, कोळी, भंडारी, कऱ्हाडी, आदिवासी बांधवांच्या सभा तालुकानिहाय होणार आहेत. जेणेकरून येत्या १३ जानेवारी २०२२  रोजी स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम भव्य करून पुन्हा एकदा विमानतळ नामकरणसाठी शासनाचे लक्ष वेधणार आहे.

    चारही जिल्ह्यातील तालुकास्तरीय सभेची सुरुवात नवी मुंबई येथून होणार आहे.  त्याअंतर्गत ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर सभेचे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे करण्यात आले आहे. त्या करिता नवी मुंबईतील २९ गावांमध्ये लवकरच गावोगावी ग्राम बैठका सुरू होणार आहेत.

    येत्या ७ डिसेंबरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी समन्वयक म्हणून पुढे यावे, असे आवाहन नवी मुंबई मुख्य समन्वयक मनोहर पाटील यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिरवणे विद्यालय सेक्टर २ नेरुळ, नवी मुंबई येथे नवी मुंबतील भूमीपुत्रांची बैठक माजी खा. संजीव नाईक, नवी मुंबई मनपा माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत, प्रकल्पग्रस्थानचे नेते डॉ राजेश पाटील, डॉ रामचंद्र घरत, दिपक पाटील, यासह विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते