शिवसेनेचं जुन्या स्टाईलमध्ये आंदोलन, आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल…

शिवसैनिकांनी आपल्या जुन्या स्टाईलमध्ये आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईतील ED कार्यालय, भाजपच्या कार्यालयाबाहेर (BJP Office Mumbai) होर्डिंग ठोकल्यानंतर आता डोंबिवलीत शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत. तसेच या बॅनरवर आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल,  अशा प्रकारचं विधान आणि बॅनर संजय राऊत यांच्या फोटोसह लावण्यात आला आहे.

डोंबिवली: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना (ED)ने एक जुन्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज्यात रान पेटलं आहे. खासदार राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीका केली होती. ED च्या चौकशीवर देखील त्यांनी सणसणीत टीका केली. त्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून डोंबिवलीत शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर खासदार राऊत यांनी केलेली विधाने लिहिण्यात आली आहेत.

शिवसैनिकांनी आपल्या जुन्या स्टाईलमध्ये आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईतील ED कार्यालय, भाजपच्या कार्यालयाबाहेर (BJP Office Mumbai) होर्डिंग ठोकल्यानंतर आता डोंबिवलीत शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत. तसेच या बॅनरवर आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल, अशा प्रकारचं विधान आणि बॅनर संजय राऊत यांच्या फोटोसह लावण्यात आला आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये केडीएमसी आणि इतर महापालिका निवडणूक असल्यानं हाच मुद्दा घेऊन शिवसेना आक्रमक होऊ शकते, असंही जाणकारांचं मत आहे. दुसरीकडे, मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलयाबाहेर शिवसेनेतर्फे सोमवारी रात्री होर्डिंग लावण्यात आलं. ‘ED येथे भाजप विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात.’ अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा ‘सामना’ रंगला आहे.

संजय राऊतांनी केला खुलासा

खासदार संजय राऊत यांनी EDच्या नोटिसीबद्दल पहिल्यांदाच काल सोमवारी पत्रकार परिषदेत खुलासा केला. EDची नोटीस गेल्या दीड महिन्यांपूर्वी आली होती, अशी कबुलीही खासदार राऊत यांनी दिली. माझी पत्नी वर्षा राऊत हिच्या नावावर १० वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. मध्यमवर्गीय घरातील मराठी शिक्षिका असलेल्या वर्षाने घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून ५० लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हणून EDकडून नोटीस पाठवली जात आहे, असा खुलासाही राऊत यांनी केला.