बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आजही विरोध कायम

जिल्हाधिकारी ठाणे यांनी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (National High Speed Rail Corp.)  लि. रेल्वे प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने घेण्यासाठी महापालिका क्षेत्रातील गावांपैकी शीळ येथील जमीन मोबदला दर ९ कोटी प्रति हेक्टर निश्चित केलेल्या दरानुसार भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क आबाधित ठेवून या भूखंडाचे अंतिम मूल्य ६ कोटी ९२ लाख ८२ हजार असे केले.

ठाणे : बुलेट ट्रेन ही ( Bullet train proposal ) ठाण्याच्या हद्दीतून जाणार आहे, त्यानुसार मौजे शीळ येथील ठाणे महापालिकेच्या नावे असलेला स. क्र. ६७/ब/५, भूखंडापैकी ३८४९.०० चौ.मी. क्षेत्राकरिता जिल्हाधिकारी ठाणे यांनी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (National High Speed Rail Corp.)  लि. रेल्वे प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने घेण्यासाठी महापालिका क्षेत्रातील गावांपैकी शीळ येथील जमीन मोबदला दर ९ कोटी प्रति हेक्टर निश्चित केलेल्या दरानुसार भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क आबाधित ठेवून या भूखंडाचे अंतिम मूल्य ६ कोटी ९२ लाख ८२ हजार असे केले.

बुलेट ट्रेनला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विरोध आजही कायम असला तरीही येथील शेतकऱ्यांचा प्रश्न असल्याने आणि महापालिकेच्या तिजोरीत रक्कम यावी या उद्देशाने आता तिचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेनेही याबाबत मवाळ भूमिका घेण्याचे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला आहे.

हा भूखंड विकास आराखड्यातील रस्त्याचा भाग असून या भागातून हायस्पीड रेल जात असल्याने एनएचएसआरसीएल यांनी भूखंडाची मालकी हक्क मागणी केली असून त्यापोटी आता पालिकेला ही रक्कम मिळणार आहे.