उल्हासनगरमधील पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू, एक जखमी, इमारत केली खाली

उल्हासनगर 5 नंबरच्या गांधीरोड परिसरात असलेल्या पारस अपार्टमेंट येथे पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

    ठाणे : उल्हासनगर 5 नंबरच्या गांधीरोड परिसरात असलेल्या पारस अपार्टमेंट येथे पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

    रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून अग्निशामक दल व बचाव दल महानगरपालिकेचे कर्मचारी , पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून इमारतीत राहणाऱ्या नागरीकांना बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

    दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक असल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाकडून दिली जात आहे.संबंधित इमारतीला नोटीस देखील बजावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.5 मजल्याच्या या इमारतीत एकूण 15 फ्लॅट असून अनेक फ्लॅट खाली असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.