manere illegal liqur

कल्याण डोंबिवली महापालिका(Kalyan Dombivali Municipal Corporation) क्षेत्रातील माणेरे गावात धडक कारवाई करत ६० लिटर गावठी दारू(60 Liter Liquer Seized)  तसेच ६३ हजार ३०० लिटर नवसागर मिश्रित रसायन राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट (Action By State Excise Department) केले आहे.

    कल्याण : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या(State Excise Department) कोकण आणि ठाणे भरारी विभागीय पथकाने कल्याण डोंबिवली महापालिका(Kalyan Dombivali Municipal Corporation) क्षेत्रातील माणेरे गावात धडक कारवाई करत ६० लिटर गावठी दारू(60 Liter Liquor Demolished)  तसेच ६३ हजार ३०० लिटर नवसागर मिश्रित रसायन नष्ट केले आहे. एकाच दिवशी एकूण १४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात(Vitthalwadi Police station) गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

    राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आवश्यक असे साहित्य नसल्याने कारवाई दरम्यान पथकांना मोठी अडचण निर्माण होत असे. मात्र आता कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक इंजिन आणि ड्रोन उपलब्ध झाले असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांना कारवाई करणे आणि दारू निर्मितीचे तळ शोधण्यात जलदगतीने यश येत आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागदेखील स्मार्ट झालेले दिसून येत आहे.

    गावठी दारू ही ग्रामीण भागातून शहराकडे घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला सापडताच ४० लिटर दारू सह दुचाकी पथकाला कल्याणमध्ये मिळाली आहे. मात्र या गाडीवरील चालक दारू माफिया हा फरार झाला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे विभागीय दुय्यम निरीक्षक आर.एन.राणे हे करत आहेत.