बाहेर फिरणाऱ्यांचे तीनतेरा वाजणार, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात देखील पोलिसांचा एक मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. नागरिकांना वाहनचालकांना संचारबंदी सुरू झाल्याने या काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत होते. विना मास्क फिरणाऱ्यांवर देखील यावेळी पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती कल्याण विभागाचे एसीपी अनिल पोवार यांनी दिली.

कल्याण : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा (Corona Virus) नवा प्रकार आढळून आल्यानंतर राज्य सरकारने खबरदारी उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात देखील पोलिसांनी संचारबंदीच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजल्यानंतर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा रस्त्यावर उतरला. नाक्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.