ऑनलाईन शिक्षणाविरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

पालघर : कोरोना महामारीच्या कारणानं संपूर्ण देश आज लॉकडाऊन मुळे मर्यादित झाला असल्यानं अनेक गरजू लोकांच्या जीवनावर गदा आली आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली आदिवासी, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं आहे. जिथं आज ही गावांत जायला रस्ते नाहीत, वीज नाही, रोजगार उपलब्ध नाही अशा दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण म्हणजे सरकारनं गरिबांची केलेली मस्कारीच आहे. ऑनलाइन शिक्षण फक्त श्रीमंतांची मुलेच घेऊ शकतात. त्यामुळे गरीब आणि श्रीमंत अशी असमान दरी निर्माण करण्याचं काम आज सरकार कडून होत आहे. याच्या निषेधार्थ जागतिक आदिवासी दिनानिमित्त श्रमजीवी संघटनेसह श्रमजीवी बाल संघटना ही हजारोच्या संखेनं रस्त्यावर उतरली. आणि पालघर पंचायत समिती समोर आपल्या मूलभूत हक्कासाठी बसून होते. 

आमची मूलं अशिक्षित राहून फक्त गोवारी,लहान मुलं सांभाळणे, पाणीच भरण्याची काम करणार नाहीत. पुन्हा एकलव्य आपला अंगठा कापून देणार नाही, जर शासनाला ऑनलाइन शिक्षण द्यायचं असेल तर आदिवासी गरीब मुलांना मोबाईल, रिचार्ज, लॅपटॉप या सुविधा द्याव्यात. अन्यथा राज्यातल्या कोणत्याच प्राथमिक विद्यार्थ्याला यावर्षी शिकवू नका असं पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड यांनी मोर्चाला संबोधित करताना म्हटलं .

आदिवासी  दिनानिमित्त सुट्टी देण्यापेक्षा आदिवासी गरीब जनतेला त्यांचे मूलभूत हक्क कसे मिळतील याचा सरकारनं विचार करावा या सुरात मोर्चा पार पडला. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी श्रमजीवी चे शालेय विद्यार्थी आणि युवक यांच्या कडून निवेदन स्वीकारल्या नंतर मोर्च्यांची सांगता करण्यातआली. यावेळी पालघर जिल्ह्यातले हजारो श्रमजीवी मोर्च्यात सामील झाले होते.