फी थकबाकी विद्यार्थ्यांना बोर्डाचे फॉर्म भरू न देणाऱ्या शाळांवर कारवाई करा, मनसेची मागणी 

कोरोनामुळे ( Corona) नोकरी-धंदा बंद झाल्याने पालकांची (Parents) आर्थिक हेळसांड झालेली असताना केवळ फी (Fees) भरणे शिल्लक असल्याने बोर्डाचे फॉर्म भरू न देणाऱ्या शाळांवर कारवाई (take action against schools)  करावी अशी मागणी मनसे (MNS) जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिन्द्रीकर (Swapnil Mahindrikar) यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

ठाणे : कोरोनामुळे (Corona virus) ऑनलाईन शिक्षण (Online Education) पद्धती सुरु झाल्यानंतरही शाळेकडून फी (School Fees) असतानाच फीची थकबाकीदार असलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळाद्वारे बोर्डाचे फॉर्म (Board Form) भरू न देण्याचे प्रकार समोर आले आहेत. कोरोनामुळे नोकरी-धंदा बंद झाल्याने पालकांची आर्थिक हेळसांड झालेली असताना केवळ फी भरणे शिल्लक असल्याने बोर्डाचे फॉर्म भरू न देणाऱ्या शाळांवर कारवाई (Take action against schools)  करावी अशी मागणी मनसे (MNS) जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर (Swapnil Mahindrakar) यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. याला आळा न घातल्यास माणसे आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचेही महिन्द्रीकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे लोकांकडे पैसे नाहीयेत. तेथे खासगी शाळांकडून जबरदस्ती पालकांकडून फी वसुली करण्याचा तगादा लावण्यात आला आहे व ज्यांनी फी भरली नाही अशा विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाचा फॉर्म नाही भरू देणार अशी ताकीद देण्यात आलेली आहेत.

सदर प्रकार खूप गंभीर असून शिक्षण अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष घालून ठाण्यातील सर्व खाजगी शाळांना अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या पालकांना वेठीस धरणे थांबवावे अन्यथा माणसे तीव्र आंदोलन करील असा इशाराही मनसेने दिला आहे.