malang gad

मलंगगड (malanggad)येथे हाजी मलंग दर्गा (haji malang dugah)असून जवळच मच्छिन्द्रनाथ यांची समाधी देखील आहे. (dispute on malangad)या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी महाआरतीचे आयोजन हिंदू धार्मिक संघटनांतर्फे करण्यात आले होते. याला मुस्लिम संघटनेने आक्षेप घेतला व जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही समुदायांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यानंतर मनसेनेदेखील या आंदोलनात उडी घेतली आहे .

    अंबरनाथ : मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणाऱ्या मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोनच दिवसांपूर्वी मलंग गडावर दोन गटात वाद झाले होते.यावेळी अनेकांवर उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मनसे कार्यकर्त्यानी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

    या पार्श्वभूमीवर आज मनसेच्या अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ व उल्हासनगर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मलंग गडावर आरती करण्याचा निर्धार केला होता. मात्र कोरोनामुळे जमाव बंदीचे आदेश असल्याने त्यांना पोलिसांनी रोखले. याच दरम्यान पोलिसांच्या झालेल्या चर्चेत आरती करण्यावर जाधव हे ठाम असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसेच्या उल्हासनगर आणि अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आता जाधव आणि मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले.

    दरम्यान पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवसह १३ मनसे पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर आरोपींची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केल्याची माहिती ॲड. कल्पेश माने यांनी दिली आहे.

    मलंगगड येथे हाजी मलंग दर्गा असून जवळच मच्छिन्द्रनाथ यांची समाधी देखील आहे. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी महाआरतीचे आयोजन हिंदू धार्मिक संघटनांतर्फे करण्यात आले होते. याला मुस्लिम संघटनेने आक्षेप घेतला व जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही समुदायांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यानंतर मनसेनेदेखील या आंदोलनात उडी घेतली आहे .