ठाणे महापालिकेच्या(Thane Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना सन २०२० -२०२१ या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त (Diwali Bonus)रुपये १५ हजार ५०० इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नरेश गणपत म्हस्के(Naresh Mhaske) आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा(Vipin Sharma) यांनी केली आहे.
ठाणे : एकीकडे कोरोना महामारीमुळे(Corona) पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना सध्याच्या घडीला ठाणे पालिकेच्या(Thane Corporation) तिजोरीत २५ कोटी शिल्लक आहेत. असे असताना देखील ठाणे महापलिकेने कोविड काळात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यात असून कर्मचाऱ्यांना १५ हजार ५००(Bonus To Thane Corporation Employees) रुपये बोनस घोषित करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या(Thane Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना सन २०२० -२०२१ या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त (Diwali Bonus)रुपये १५ हजार ५०० इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नरेश गणपत म्हस्के(Naresh Mhaske) आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा(Vipin Sharma) यांनी केली आहे.
या बैठकीमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी १५,५०० इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिका आस्थापनेवरील कायम अधिकारी कर्मचारी ६,८८५ एकत्रित मानधनावरील कर्मचारी ३१४, शिक्षण विभागाकडील एकूण कर्मचारी ९७३ आणि परिवहन सेवेमधील १८९७ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी एकूण १६ कोटी इतका खर्च होणार आहे. सदर सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे महापालिका आुयक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.