कोरोना रुग्ण वाढीत ठाणे जिल्हा ४ थ्या क्रमांकावर 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्या ही वाढत आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नागपूर, तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आणि चौथ्या क्रमांकावर ठाणे जिल्हा आहे.

  ठाणे : ठाण्यात कोरोनाचा टक्का आणि रुग्ण बरे होण्याचा टक्का घसरला असून कोरोनाचे रोज ५०० ते ८०० च्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे ठाणे जिल्हा हा राज्यात रुग्ण वाढीत ४ थ्या क्रमांकावर आहे. मात्र दुसरीकडे जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासन मात्र गंभीर दखल घेतली नसल्याचे चित्र दिसत आहे. होळी सणाबाबत ठाणे महापालिकेने नियमांचे एक पत्रक काढले आहे . याशिवाय काहीच हालचाली दिसत नाही. यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांचे रहस्य काय? असा प्रश्न पडत आहे.

  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्या ही वाढत आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. तर दुसर्या  क्रमांकावर नागपूर, तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आणि चौथ्या क्रमांकावर ठाणे जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्यात ११ फेब्रुवारी रोजी रुग्णांची संख्या ४ हजार ३१७ एवढी होती. तर २३ मार्च रोजी रुग्णसंख्या २२ हजार ५१३ एवढी झाल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. ठाण्यात ४५ टक्के रुग्ण हे घरीच होम कोरोटाईन असल्याची माहिती आहे.

  प्रशासनाच्या हालचाली मंदावल्या 

  कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. आठवड्यात ठाणे पालिकेच्या हद्दीतील परिसरात कोरोना रुग्ण संख्या ५०० वरून ८०० वर पोहचलेली आहे. मात्र ठाणे पालिकेची जनजागृती, जिल्हा प्रशासनाची जनजागृती, पालिकेची मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर होणारी कारवाई, चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असे कुठलेच चित्र सध्या ठाण्यात दिसत नाही. मात्र रोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

  दिनांक  रुग्णसंख्या    मृत्यू  

  २० मार्च     ५६४.               ०२

  २१ मार्च     ६३८                ०२

  २२ मार्च     ५९०               ०३

  २३ मार्च      ७७५              ०१

  २४ मार्च     ७९३              ०२