मनसेचा नवा फंडा, समस्या तुमची, मदत आमची

"समस्या तुमची...मदत आमची" या उपक्रमात एका फोनवर नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा संकल्प मनसेच्या वतीनं करण्यात येणार आहे. ठाण्यात सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी धावून येणारा पक्ष असा लौकिक व्हावा, यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. मनसे पदाधिकारी यासाठी सतत कार्यरत असल्याचं सांगितलं जातं.

 

ठाणे : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य मेटाकुटीला आलेले आहेत. नागरिकांची अर्थव्यवस्था ढासळल्याने अनेक समस्या दैनंदिन जीवनात निर्माण झालेल्या आहेत. मात्र या समस्यांना सोडविण्यासाठी मनसेद्वारे नवा फंडा आणि उपक्रम राबविण्यात येत आहे. “समस्या तुमची…मदत आमची” या उपक्रमात एका फोनवर नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा संकल्प मनसे ठाणे शहर सहसचिव अक्षय ज. करंजवकर यांनी व्यक्त केला आहे.

ठाण्यात सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी धावून येणारा पक्ष असा लौकिक व्हावा, यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. मनसे पदाधिकारी यासाठी सतत कार्यरत असल्याचं सांगितलं जातं. लोकांना ईएमआय, वाढीव लाईटबील, सामाजिक त्रास अशा विविध समस्या असणाऱ्या ठाणेकरांनी ९८२०३३३७१० नंबरवर फोन करून समस्या कळवली, तर मनसे कार्यकर्ते त्वरित त्यावर उपाय शोधतील, अशी माहिती करंजवकर यांनी दिली.