कोरोनाचा वाढता कहर- ठाणे पालिका प्रशासनाने नाट्यगृह आणि सभागृहांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जारी

वाढता कोरोना नियंत्रणात(corona) आणण्यासाठी ठाणे महापालिकेने(thane corporation) प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केली आहे. नाट्यगृह आणि सभागृहांसाठी मार्गदर्शक सूचना (rules for drama thetre and meeting halls)जारी केल्या आहेत.

  ठाणे : वाढता कोरोना नियंत्रणात(corona) आणण्यासाठी ठाणे महापालिकेने(thane corporation) प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केली आहे. नाट्यगृह आणि सभागृहांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.तसेच याबाबतचे निर्बंध ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.

  काय आहेत निर्बंध ?

  • नाट्यगृह आणि सभागृह एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनेच चालवावीत.
  • मास्कशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये.
  • प्रवेश देताना प्रत्येकाचे तापमान तपासूनच प्रवेश द्यावा.
  • हँड सॅनिटायझर,मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.
  • नाट्यगृह अथवा सभागृहांचा उपयोग कोणत्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केला जाऊ नये.

  या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित नाट्यगृह अथवा सभागृह हे केंद्र शासनाकडून कोरोनाचे पूर्णत: निर्मूलन झाल्याचे जाहीर होत नाही.तोपर्यंत बंद ठेवले जाईल. तसेच संबंधित मालकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल,असा इशारा ठाणे महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.