ठाणे पोलिसांनी राबवलं ‘ऑपरेशन ऑल आऊट, १७० आरोपींना अवघ्या ४ तासांमध्ये ठोकल्या बेड्या

ठाणे पोलिसांनी (Thane Police) अवघ्या चार तासांत एकूण १७० आरोपींना गजाआड (170 Accused Arrested In 4 Hours) केलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली आहे.

    ठाणे: महाराष्ट्रातील (Maharashtra)अनेक शहरांमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र पोलिसही वेगाने या सगळ्या गुन्ह्यांच्या घटनांचा वेगाने तपास करताना दिसत आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Police) अवघ्या चार तासांत एकूण १७० आरोपींना गजाआड (170 Accused Arrested In 4 Hours) केलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून पुढे ४ तास ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’(Operation All Out) राबवलं. या कारवाईत ठाणे पोलिसांनी अवघ्या चार तासांत शहरातील एकूण १७० आरोपींना आणि संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण १५२ पोलीस अधिकारी तर ८३४ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. एकाच वेळी अचानक सुरू झालेल्या ऑपरेशमुळे बेसावध असलेल्या अनेक सराईत गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    चार तासांत ठाणे पोलिसांनी परिसरातील अनेक आरोपींसह इतरही गोष्टींची देखील झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी हॉटेल, लॉज, ढाबे, रेल्वे स्टेशन, बस स्थानकं, गर्दुल्यांचा वावर असलेली ठिकाणं, गुन्हेगारी वस्त्या आणि संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी केली आहे. यावेळी पोलिसांनी तडीपार, फरारी आणि सराईत आरोपींची झाडाझडती घेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

    यावेळी पोलिसांनी बेकायदेशीर सुरू असलेल्या धंद्यावरही छापे टाकले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १७० जणांना अटक केली आहे. यामध्ये तडीपार, सराईत गुन्हेगारांसोबत संशयित गुन्हेदारांचा देखील समावेश आहेत.