Thane police order issued after state order; Police keep a close eye on curfew nrvb
राज्याच्या आदेशानंतर ठाणे पोलिसांचे फर्मान जारी; संचारबंदीत भटक्यांवर पोलिसांची करडी नजर

ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे, कळवा, मुंब्रा, कल्याण डोंबिवली, भिवंडी शहर, अंबरनाथ बदलापूर, उल्हासनगर असे सर्व महानगरपालिका क्षेत्र येतात, त्या सर्व आस्थापना ह्या रात्री ११ वाजता बंद करणे अनिवार्य असून नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

  • ठाणे पोलिसांना कारवाई लागणार भटकंती आणि तारेवरची कसरत
  • वैद्यकीय क्षेत्र आणि अत्यावश्यक सेवेला सूट

ठाणे : राज्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपार्यंत संचारबंदीचे आदेश जरी केल्यानंतर मंगळवारी ठाणे पोलिसांनीही ठाणे पोलीस आयुक्तालयात संचारबंदी लागू केल्याचे फर्मान काढले. संचारबंदीत आता भटक्या नागरिकांना छाप लागणार आहे. तर ठाणे पोलिसांना मात्र आता भटकंतीवर अधिक भर द्यावा लागणार आहे. ठाणे पोलीस आता नाक्यानाक्यावर “रात के राजा” असलेल्या भटक्यांवर करडी नजर ठेवून आहेत. या संचारबंदीत वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलेली आहे.

२२ डिसेंबर ते ५ जून पर्यंत रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत  रस्त्यावर केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच रस्त्यावर फिरण्यास मुभा आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर संचारबंदीत दिसल्यास त्यांच्यावर कारवाईचे संकेत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.

विनाकारण फेरफटका मारण्यास, सायकल, मोटारसायकल किंवा गाडीने अनावश्यक बाहेर पडल्यास, कलम १८८ द्वारे कारवाई केली जाणार आहे, तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यास, पब, हॉटेल, क्लब, रिसॉर्ट सुरू ठेवण्यास मनाई राहणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे, कळवा, मुंब्रा, कल्याण डोंबिवली, भिवंडी शहर, अंबरनाथ बदलापूर, उल्हासनगर असे सर्व महानगरपालिका क्षेत्र येतात, त्या सर्व आस्थापना ह्या रात्री ११ वाजता बंद करणे अनिवार्य असून नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

येऊरवर ठाणे पोलिसांचे लक्ष..अनधिकृत ढाब्यांचे, हॉटेल्सचे शटर होणार बंद

ठाणे पोलिसांनी २२ डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर केल्याने आणि कारवाईचा इशारा दिल्याने नव्या वर्षाच्या रात्र गाजविण्याचा विविध ठाण्यातील कार्यक्रमांना आता ब्रेक लागला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी येऊर या हिल परिसरात मोठ्या प्रमाणात पार्ट्या, बंगल्यात पार्ट्या, हॉटेल्स आणि धाबे हे हाऊसफुल्ल असतात.

आता संचारबंदी लागू केल्याने या ढाब्यांचे आणि हॉटेल्सची शटर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बंद होणार आहेत. तर तळीरामांना मद्य प्रश्न करून भटकंती न करता नव्या वर्षाचा केक आपल्या घतरातच कापावा लागणार आहे. यंदा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यात रस्ते गजबजलेले असतात मात्र यंदा नव्या वर्षाच्या प्रारंभीच रस्त्यावर शुकशुकाट दिसणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पोलिसही कडेकोट बंदोबस्त लावणार आहेत.