महिलांवरील अत्याचारावर ठाणे पोलिसांची असणार करडी नजर;  महिला तक्रार दिनी ३६३ तक्रारी काढल्या निकाली 

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात दाखल महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी परिमंडळ स्तरावर "महिला तक्रार दिन" चे आयोजन करून महिलांच्या तक्रारी निकालात काढण्याची विशेष उपक्रम सुरु केला आहे. महिला तक्रार दिनी भरोसा सेलच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने महिलांच्या ५४५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ३६३ तक्रारींचा निपटारा ठाणे पोलिसांनी करण्यात यश मिळवले आहे. 

ठाणे (Thane).  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात दाखल महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी परिमंडळ स्तरावर “महिला तक्रार दिन” चे आयोजन करून महिलांच्या तक्रारी निकालात काढण्याची विशेष उपक्रम सुरु केला आहे. महिला तक्रार दिनी भरोसा सेलच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने महिलांच्या ५४५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ३६३ तक्रारींचा निपटारा ठाणे पोलिसांनी करण्यात यश मिळवले आहे.

कोरोनाच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणी दाखल झालेल्या महिलांच्या तक्रारीची गंभीर दखल ठाणे पोलिसांनी घेतलेली आहे. त्यासाठीच ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये “महिला तक्रार दिन” चे आयोजन करण्याच्या आदेश दिले होते. त्यानुसार पाच परिमंडळात अशा  प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ठाणे आयुक्तालयात पाच परिमंडळात दाखल झालेल्या महिलांच्या तक्रारीची दाखल घेत शनिवारी भरोसा सेलच्या दिनामध्ये विविध पोलीस ठाण्यातील ५४५ महिलांच्या तक्रारी दाखल होत्या.

त्यापैकी ३६३ तक्रारी या निकाली काढण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या परिमंडळ-४ उल्हसनगर परिसरातील १४८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांच्या या उपक्रमाला महिलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे.