Corona Virus Image

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येने ३४ हजारांचा आकडा पार केला आहे. आज नव्या ५८८ कोरोना रुग्णांची (New Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू (Deaths)  झाला असून गेल्या २४ तासांत १८७ रुग्णांना डिस्चार्ज (Discharge)देण्यात आला आहे. आजच्या या ५८८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३४,१०८ झाली आहे.

 कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येने ३४ हजारांचा आकडा पार केला आहे. आज नव्या ५८८ कोरोना रुग्णांची (New Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू (Deaths)  झाला असून गेल्या २४ तासांत १८७ रुग्णांना डिस्चार्ज (Discharge)देण्यात आला आहे. आजच्या या ५८८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३४,१०८ झाली आहे. यामध्ये ४९८१ रुग्ण उपचार घेत (Active Patients) असून २८,४०४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ५८८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ७५, कल्याण प.- १६४, डोंबिवली पूर्व १८४, डोंबिवली प- ११५, मांडा टिटवाळा – ३३, मोहना – १२, तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून १८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १२ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून (Covid Care Center), १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.