The plane will not take off from Navi Mumbai Airport unless Diba's name is mentioned; Elgar of Union Minister Ramdas Athavale at Bhumiputra Nirdhar Parishad

दिबा सर्वांचे बाप होते, त्यांनी सर्व महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे, त्यामुळे दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, अशा शब्दात नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्ही कोपर येथे नवी मुबई विमानतळ क्षेत्रात झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत केली(The plane will not take off from Navi Mumbai Airport unless Diba's name is mentioned; Elgar of Union Minister Ramdas Athavale at Bhumiputra Nirdhar Parishad).

  पनवेल : दिबा सर्वांचे बाप होते, त्यांनी सर्व महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे, त्यामुळे दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, अशा शब्दात नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्ही कोपर येथे नवी मुबई विमानतळ क्षेत्रात झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत केली(The plane will not take off from Navi Mumbai Airport unless Diba’s name is mentioned; Elgar of Union Minister Ramdas Athavale at Bhumiputra Nirdhar Parishad).

  ठाकरे सरकारला भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडावी, अशा शब्दात घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडिलांच्या नावाचा विचार न करता वडीलधारी दिबांचे नाव देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही केले.

  दिबांचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राहिला आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय सरकारला घेणे भाग पडले आहे. दिबा संघर्षशील नेते होते. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गौरवशाली कार्य केले आहे. समाजाला न्याय देण्याचा संघर्ष सर्वानी पाहिला आहे. त्यामुळे वाटेल ते झाले तरी चालेल पण विमानतळाला दिबांचेच नाव लागलं पाहिजे असे सांगतानाच त्यांच्या नावासाठी आरपीआयचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

  दिबांनी सर्वांसाठी संघर्ष केला. भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून ते जेलमध्येही गेले आहेत. सिडकोने जमिनी घेतल्या पण मात्र प्रकल्पग्रस्तांच्या जीवनाचा विचार सिडकोने केला नाही. गावांचे योग्य पुनर्वसन, बांधकाम परवानगी, रोजगार, नोकरी, असे अनेक प्रश्न आहेत ते सिडको आणि राज्य सरकार सोडवू शकतात. ते प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

  हे सुद्धा वाचा
  • 2022