मटका किंगच्या पत्नीला संपवण्याचा रचला कट; मुंबई पोलिसांना डाव उधळण्यात यश

विनोद भगतला (Vinod Bhagat) भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा असून मटका व्यवसायावर पूर्णपणे नियंत्रण मिळवायचं आहे. यासाठी त्याने युकेमधील कॉन्ट्रॅक्ट किलर बशीर उर्फ मामू याला ६० लाखांची सुपारी दिली.

मटका किंग सुरेश भगतच्या (Suresh Bhagat) लहान भावाने सुरेशच्या पत्नीला संपवण्यासाठी ६० लाखांची सुपारी दिली होती. परंतु मुंबई पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी हा कट उधळून लावला आहे. मुंबईतील (Mumbai) गँगवॉरची आठवण करुन देणाऱ्या या हत्येच्या कटामागे सुरेश भगतचा लहान भाऊ विनोद भगत सहभागी होता. सुरेश भगतच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा कट रचण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. विनोद भगतला (Vinod Bhagat) भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा असून मटका व्यवसायावर पूर्णपणे नियंत्रण मिळवायचं आहे. यासाठी त्याने युकेमधील कॉन्ट्रॅक्ट किलर बशीर उर्फ मामू याला ६० लाखांची सुपारी दिली.

बशीर उर्फ मामू याला भगतने मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून सुपारी दिली. यानंतर रणवीर शर्मा उर्फ पंडित याला १४ लाख रुपये पाठवण्यात आले. पंडित याने हत्येसाठी तिंघांना नेमलं होतं, अशी माहिती मुंबई क्राइम ब्रांचचे डीसीपी अकबर पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुढे त्यांनी सांगितलं की, एकदा पैसे मिळाल्यानंतर बिजनौर स्थित शूटर्सनी जया आणि तिच्या बहिणीच्या घराची रेकी करण्यास सुरुवात केली. फेब्रुवारीत हे सर्व सुरु झालं होतं. पण लॉकडाउनमुळे त्यांना आपला प्लॅन पुढे ढकलावा लागला. नंतर त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करत शस्त्र तसंच फोटो मिळवले होते.

अन्वर दर्जी याला अटक केल्यानंतर त्याचे सहकारी पंडीत आणि जावेद यांनाही उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून अटक करण्यात आली. त्यांनी बशीर आणि विनोद भगतची माहिती दिल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली.