The scenic Lotus Lake at Seawood will soon come under the control of Navi Mumbai Municipality; CIDCO's green lantern

नवी मुंबई शहराला अधुनितेसह निसर्गाचा वरदहस्त देखील लाभला आहे. खाडी किनाऱ्यामुळे शहराला सौंदर्य लाभले आहे. शहरांतर्गत विकासामुळे शहरात असणाऱ्या हिरवळीचे नुकसान होत असले तरी; अद्यापही अनेक निसर्गस्थळे शहरात अस्तित्वात आहेत. शहरात एकही पर्यटन स्थळ नसल्यान पालिकेकडून अशी नैसर्गिक स्थळे विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात आता सिवूड सेक्टर २७ येथील लोटस तलाव या निसर्गसंपन्न पाणथळ स्थळाची भर पडणार आहे. हा तलाव सध्या सिडकोकडे असून; लवकरच तो पालिकेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. त्यामुळे पालिकेला ही पाणथळ जागा सुशोभीत करून शहराचे सौंदर्य वाढवणार आहे. तर, परिसरात देखील मियावाकी सारखे प्रकल्प राबवता येणार आहेत(The scenic Lotus Lake at Seawood will soon come under the control of Navi Mumbai Municipality; CIDCO's green lantern ).

  नवी मुंबई, सिद्धेश प्रधान : नवी मुंबई शहराला अधुनितेसह निसर्गाचा वरदहस्त देखील लाभला आहे. खाडी किनाऱ्यामुळे शहराला सौंदर्य लाभले आहे. शहरांतर्गत विकासामुळे शहरात असणाऱ्या हिरवळीचे नुकसान होत असले तरी; अद्यापही अनेक निसर्गस्थळे शहरात अस्तित्वात आहेत. शहरात एकही पर्यटन स्थळ नसल्यान पालिकेकडून अशी नैसर्गिक स्थळे विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात आता सिवूड सेक्टर २७ येथील लोटस तलाव या निसर्गसंपन्न पाणथळ स्थळाची भर पडणार आहे. हा तलाव सध्या सिडकोकडे असून; लवकरच तो पालिकेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. त्यामुळे पालिकेला ही पाणथळ जागा सुशोभीत करून शहराचे सौंदर्य वाढवणार आहे. तर, परिसरात देखील मियावाकी सारखे प्रकल्प राबवता येणार आहेत(The scenic Lotus Lake at Seawood will soon come under the control of Navi Mumbai Municipality; CIDCO’s green lantern ).

  सिवूड येथील लोटस तलाव हे त्या तलावात उगवणाऱ्या कमळांमुळे प्रसिद्ध आहे. कमळांमुळे या तलावाला शोभा आलेली आहे. जवळपास ५० एकरांवर तलाव व तलावालागतचा परिसर पसरलेला आहे. मध्यंतरी सिडकोकडून सातय्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे या तालावाला झोपड्यांनी विळखा घातला होता. त्यामुळे या निसर्गसंपन्न तलावाला बकाल स्वरुप प्राप्त झाले होते.

  सामान्य नागरिक मात्र त्यास पालिकेला जबाबदार धरत होते. सातत्याने पालिकेकडे हा तलाव व परिसर अतिक्रमण मुक्त करून सुशोभीत करावा अशी मागणी होत होती. झोपड्या हटवून  परिसराला  मात्र त्याविरोधात तक्रारी आल्यावर पालिकेने हे अतिक्रमण हटवून हा तलाव अतिक्रमण मुक्त केला होता. मात्र अद्यापही तलावात कचरा साठला असून; परिसरात डेब्रिज पडलेले असून ते स्वच्छ करण्याचे आव्हान आहे.

  तहसीलकडून पाणथळ जागा म्हणून जाहीर

  तहसील विभागाकडून ही जागा पाणथळ जागा म्हणून जाहीर करण्यात आली आहे. याठिकाणी मधल्या काळात सिडकोकडून डेब्रिज टाकण्याची परवानगी देण्यात आल्याची तक्रार आली होती.  पालिकेने  या जागेवर भराव टाकण्यास सिडकोने कोणासही परवानगी देऊ नये असे सुचवले होते.  त्यामुळे हा तलावाचा परिसर अद्यापही डेब्रिज मुक्त राहिला आहे.

  दुसरे ज्वेल ऑफ नवी मुंबई अस्तित्वात येण्याची शक्यता

  नेरुळ व सिवूडला लागून असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई हा उपक्रम संपूर्ण एमएमअरमध्ये प्रसिद्ध आहे. येथे फिरण्यास येणाऱ्या नागरिकांकडून त्याची प्रचिती येते. त्यामुळे लवकरच  हस्तांतरण प्रकिया पूर्ण झल्यावर पर्यावरण प्रेमी असलेल्या आयुक्तांकडून लोटस तलावाच्या सुशोभीकरणाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसे झाल्यास नवी मुंबईकरांना फिरण्यासाठी लोटस तलावाचे लोभस रूप अनुभवता येणार आहे.

  नवी मुंबईत फार कमी नैसर्गिक जागा आहेत. त्यातील लोटस तलाव एक आहे. पालिकेने सिडकोकडे याबाबत मागणी केली होती. सिडकोने त्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. ही बाब  पर्यवरणाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. या पर्यटन स्थळ म्ह्णून पालिकेने हे स्थळ विकसित करावे.  यासह ज्या पद्धतीने पालिकेने एनआरआय फ्लेमिंगो पाणथळ जागा देखील स्वतःकडे घ्यावी अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते बी एन कुमार यांनी केली.

  लोटस तलाव पालिकेकडे द्यावा अशी मागणी सिडकोकडे केली होती. सिडकोने त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच ही प्रकिया पूर्ण केली जाईल. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आयुक्तांच्या आदेशाने सुशोभिकरणाबाबत निर्णय घेण्यात येईल. एनआरआय पाणथळ जागेबाबत सिडकोने कोणताही प्रस्ताव ठवेलेला नाही.

  संजय देसाई, मुख्य शहर अभियंता, नवी मुंबई पालिका
  हे सुद्धा वाचा
  • 2022