वसई रेल्वे स्थानकावरचा थरार ; मृत्यूच्या दाढेतून महिलेला वाचवलं, पहा Video

प्रमिला मारू असं त्या महिला प्रवाशाचे नाव असून त्या हैद्राबाद येथे राहणाऱ्या आहेत.रेल्वे प्रवासात चहा पिण्यासाठी वसई रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबली होती. प्रमिला मारू या रेल्वेतून उतरल्या होत्या. मात्र ट्रेन चालू होताच ती पकडण्यासाठी त्या धावत गेल्या असता त्यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या.

    वसई : असं म्हणतात की ‘देव तारी त्याला कोण मारी’ आणि ते प्रत्यक्षात वसई रेल्वे स्थानकावर (Vasai Road Railway Station)अनुभवायला मिळाले. धावत्या रेल्वेत चढताना पाय घसरुन महिला रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकली होती. पण, वेळीच देवदुताप्रमाणे रेल्वे पोलीस मदतीला धावून आले आणि या महिलेचा जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वसई रेल्वे स्थानकावरप्लॅटफॉर्म क्र.७ वर शनिवारी ही घटना घडली होती.

     

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला मारू असं त्या महिला प्रवाशाचे नाव असून त्या हैद्राबाद येथे राहणाऱ्या आहेत.रेल्वे प्रवासात चहा पिण्यासाठी वसई रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबली होती. प्रमिला मारू या रेल्वेतून उतरल्या होत्या. मात्र ट्रेन चालू होताच ती पकडण्यासाठी त्या धावत गेल्या असता त्यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. धावत्या रेल्वेमुळे त्यांना जोराचा धक्का बसला आणि त्या रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरात अडकल्या गेल्या. मात्र, त्याचवेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांना बाहेर खेचून काढले.या घटनेत महिलेच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.