नवी मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख १० हजार ५५४ इतकी; आरोग्य यंत्रणा सतर्क

नवी मुंबईत १६५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर ३७ जण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख १० हजार ५५४ झाली असून बरे झालेल्यांची संख्या १ लाख ०७ हजार ८९७ झाली आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेट ९७.५९% टक्क्यांवर घसरला आहे(The total number of corona victims in Navi Mumbai is 1 lakh 10 thousand 554; Health system alert).

    घणसोली : नवी मुंबईत १६५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर ३७ जण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख १० हजार ५५४ झाली असून बरे झालेल्यांची संख्या १ लाख ०७ हजार ८९७ झाली आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेट ९७.५९% टक्क्यांवर घसरला आहे(The total number of corona victims in Navi Mumbai is 1 lakh 10 thousand 554; Health system alert).

    नवी मुंबई वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता चिंतेची बाब निर्माण झाली आहे . सद्य स्थितीत नवी मुंबईत ५८८ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात सातत्याने शून्य मृत्यूची नोंद होत असल्याने मृत्यूदरात घट झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाशी झगडणाऱ्या नवी मुंबईकरांनसाठी हा मोठा दिलासादायक ठरत आहे.

    नवी मुंबईच्या आठही विभागांत मिळून ७ हजार ५४६ रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. एकूण रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या १५ लाख ८१ हजार ५६८ झाली आहे. एकूण आर.टी.पी. सी.आर टेस्ट केलेल्यांची संख्या ९ लाख ९६ हजार ०३९ झाली असून कोविड टेस्ट केलेल्यांची एकूण संख्या २५ लाख ७७ हजार ६०७ झाली आहे. एकूण ७ हजार ९३६ जणांचा अहवाल प्रलंबित आहेत.

    नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर २७, नेरुळ ३१, वाशी १७, तुर्भे १२, कोपरखैरणे २०, घणसोली ३२, ऐरोली १३, दिघा ०३, इतके रुग्ण आढळले आहेत.