theft

शिवाजी उद्योग नगर पोलीस चौकी(Theft In Front Of Police Station) समोरील शिवम मेडिकल(Theft In Shivam Medical) दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोकड आणि सामानाची चोरी केली. भर रस्त्यावर चोरी झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

    कल्याण: डोंबिवलीतील(Dombivali) मानपाडा मुख्य रस्त्यावरील ऑप्टिलाईफ हॉस्पिटल शेजारील शिवाजी उद्योग नगर पोलीस चौकी(Theft In Front Of Police Station) समोरील शिवम मेडिकल(Theft In Shivam Medical) दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोकड आणि सामानाची चोरी केली. भर रस्त्यावर चोरी झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

    डोंबिवली शहरातील दुधनाथ यादव यांच्या शिवम मेडिकलचे शटर उचकवून चोरट्यांनी सकाळी ५ च्या दरम्यान दुकानात प्रवेश केला. दुकानातील १५ हजारांची रोकड आणि कॉस्मेटिक सामान चोरले. शहराच्या सदैव वर्दळ असणाऱ्या भागात ही घटना घडल्याने चोरांची हिंमत वाढविल्याचे दिसून येत आहे. दुकानाच्या बाजूला २४ तास चालणारे ऑप्टिलाईफ हॉस्पिटल आहे. या भागात सदैव पेशंटची येजा असते असे असतानादेखील चोरांनी केलेली हिंमत चिंताजनक आहे.

    दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोराचा चेहरा दिसून येत असून रोकड आणि सामान पिशवीमध्ये भरतानाचे फुटेज मिळाले आहे. याबाबत दुकानदाराने पोलिसांकडे प्राथमिक तक्रार दिली असून फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.