
75 वर्षीय राजकुमार ताकमोघे यांनी लॉकडाऊनमध्ये आपले राहिलेले स्वप्न पूर्ण केले असून, त्यांनी B.A ची पदवी प्राप्त केली आहे. दोन महिन्यापूर्वी दिलेल्या परीक्षेत त्यांना 69 टक्के मार्क्स मिळाले आहेत(These grandparents really made good use of the lockdown! Obtained B.A degree at the age of 75).
नवी मुंबई : 75 वर्षीय राजकुमार ताकमोघे यांनी लॉकडाऊनमध्ये आपले राहिलेले स्वप्न पूर्ण केले असून, त्यांनी B.A ची पदवी प्राप्त केली आहे. दोन महिन्यापूर्वी दिलेल्या परीक्षेत त्यांना 69 टक्के मार्क्स मिळाले आहेत(These grandparents really made good use of the lockdown! Obtained B.A degree at the age of 75).
कित्येक वर्षापासून बाळगलेले ध्येय पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.हे पूर्ण करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. लग्नाअगोदर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, लग्नानंतर मुलांचे शिक्षण आणि त्यांची लग्ने मात्र मागील लॉकडाऊन मध्ये त्यांनी आपल्याला मिळालेल्या वेळेचा उपयोग करत.
फॉर्म भरून अभ्यास केला आणि शेवटी यश मिळालेच.या संपूर्ण परिश्रमात आपल्याला कुटुंबाची खास करून आपल्या पत्नीची साथ लाभली असल्याचेही त्यांनी सांगितले.