हुक्का पार्लरचा प्रतिकात्मक फोटो
हुक्का पार्लरचा प्रतिकात्मक फोटो

कल्याण ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत बल्याणी परिसरात बेकायदेशीर पणे सुरु असलेल्या हुक्का पार्लर वर धडक देत कारवाईचा बडगा उचलित बेकायदेशीर पणे हुक्का चालविणाऱ्या चालकांस अटक केली. तर हुक्का पिण्यास आलेल्या तरूणांईनी पळ काढल्याची घटना शनिवारी रात्री घडली. शुक्रवारी रात्री कल्याण क्राईम बाँन्र्च ने आधारवाडी शहरीभागातील चसका कँफेवर कारवाई करीत हुक्का पार्लरवर कारवाईचा बडगा उचलला. ह्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टिटवाळा ग्रामीण भागातील बल्याणी नांदप रोड परिसरातील चाळी समोरील भागात हा प्रकार उघडकीस आला.

कल्याण (Kalyan).  कल्याण ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत बल्याणी परिसरात बेकायदेशीर पणे सुरु असलेल्या हुक्का पार्लर वर धडक देत कारवाईचा बडगा उचलित बेकायदेशीर पणे हुक्का चालविणाऱ्या चालकांस अटक केली. तर हुक्का पिण्यास आलेल्या तरूणांईनी पळ काढल्याची घटना शनिवारी रात्री घडली. शुक्रवारी रात्री कल्याण क्राईम बाँन्र्च ने आधारवाडी शहरीभागातील चसका कँफेवर कारवाई करीत हुक्का पार्लरवर कारवाईचा बडगा उचलला. ह्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टिटवाळा ग्रामीण भागातील बल्याणी नांदप रोड परिसरातील चाळी समोरील भागात हा प्रकार उघडकीस आला.

मोकळ्या जागेत बाजुने नेटने आडोसा करीत उभारलेल्या हुक्का पार्लरवर कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली, पी एस् आय् कमालाकर मुंंन्डे यांनी शनिवारी रात्री कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी हुक्का फ्लेवर जप्त करीत धुम्रपान अधिनियम २००३ कलम ४, २१ नुसार गुन्हा दाखल केला. या दरम्यान बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविणाऱ्या माहुरूत जावेद गुजर वय (२५) वर्षे यांस अटक केली. रविवारी हुक्का पार्लर चालकांची जामिनीवर सुटका झाल्याची माहिती तपास आधिकारी पी एस् आय् कमालाकर मुंंन्डे यांनी संपर्क साधला असता दिली. या बेकायदेशीर हुक्का पार्लरच्या कारवाईने बेकायदेशीर हुक्का पार्लर चे लोण शहरी भागासह ग्रामीण भागातील तरूणाईला व्यसनाधीनता कडे नेत असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.