कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता भरावे लागणार शुल्क, महापालिका दर किलोमागे आकारणार एवढे शुल्क

गृहसंकुलांनी स्वत:च्या आवारातच कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यासाठी चार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले. त्यास नगरसेवकांनी ठाम विरोध दर्शवला. या प्रस्तावातून  आता गृहसंकुलांना वगळले असून हॉटेल, मॉल्स व मंगल कार्यालयांना  मात्र हे सेवा शुल्क द्यावे लागणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीतील आस्थापनांना आता घनकचरा सेवा शुल्क आकारण्यात येंणार आहे. यात हॉटेल्स, मॉल्स आणि मंगल कार्यालये यांचा समावेश आहे. या सेवा शुल्कातून गृह्संकुलाना मात्र वगळण्यात  आले आहे. दरम्यान महास्वभेत महापौर नरेश म्हस्के यांनी गृह्संकुलाना घनकचरा सेवा शुल्क आकारू नये, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता गृह्संकुलाना सूट  मिळाली आहेत. तर हॉटेल्स, मंगल कार्यालये, मॉल्स यांना मात्र प्रती किलो ४ रुपये दराने सेवा शुल्क भरावे  लागणार आहे.

घनकचरा सेवा शुल्क वसुलीबाबतचा प्रस्ताव मंगळवारी प्रशासनाच्या वतीने महासभेत मांडण्यात आला होता. या विषयावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या  धोरणावर कडाडून टीका केली होती.  ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करताना प्रति किलो चार रुपयेप्रमाणे सरसकट सगळ्यांनाच शुल्क आकारण्यात येणार होते. मात्र गृहसंकुलांकडून कचऱ्याच्या  वर्गीकरणाची अपेक्षा असली तरी स्वत: पालिकेच्या प्रकल्पात मात्र सुका व ओला कचरा वेगळा केला जात नाही.  असे असताना सगळ्यांनाच समान न्याय देण्यात यावा, अशी मागणी महासभेत करण्यात आली.

ठाण्यात रोज १६४ मेट्रिक टन एवढा कचरा जमा होतो. त्यात ९९ मेट्रिक टन ओल्या कचऱ्याचा समावेश आहे. गृहसंकुलांनी स्वत:च्या आवारातच कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यासाठी चार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले. त्यास नगरसेवकांनी ठाम विरोध दर्शवला. या प्रस्तावातून  आता गृहसंकुलांना वगळले असून हॉटेल, मॉल्स व मंगल कार्यालयांना  मात्र हे सेवा शुल्क द्यावे लागणार आहे.