vashi toll naka

नवी मुंबई (Navi Mumbai) शहर हे मुंबईला लागून आहे. नवी मुंबईतील बहुतांश वाहने दररोजच मुंबईला ये-जा करत असतात. नवी मुंबई पासिंग असलेल्या एमएच ४३ वाहनांना वाशी व ऐरोली येथील टोल माफ (Toll Waiver For Navi Mumbai Citizens) करावा याकरिता आमदार मंदा म्हात्रे गेली ६ वर्षे मागणी करीत आहेत.

    नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) एमएच ४३ वाहनांना वाशी व ऐरोली टोल माफ  (Toll Waiver For Navi Mumbai) करण्यात यावा, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे  (MLA Manda Mhatre) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde To Gave Toll Waiver To Navi Mumbai Citizens) याच्याकडे केली आहे.  याबाबत सातत्याने आमदार म्हात्रे पाठपुरावा करत आहेत. मुख्य म्हणजे या मागणीबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनीही सकारात्मक चर्चा करून सदरबाबत लवकरच कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत. ही बाब नवी मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा देणारी ठरणार आहे.

    नवी मुंबई शहर हे मुंबईला लागून आहे. नवी मुंबईतील बहुतांश वाहने दररोजच मुंबईला ये-जा करत असतात. नवी मुंबई पासिंग असलेल्या एमएच ४३ वाहनांना वाशी व ऐरोली येथील टोल माफ करावा याकरिता आमदार मंदा म्हात्रे गेली ६ वर्षे मागणी करीत आहेत. २०१८ च्या हिवाळी अधिवेशनातही आमदार म्हात्रे यांनी औचित्याच्या मुद्द्यावर सभागृहात हा विषय मांडला होता. मात्र अजूनही याबाबत कार्यवाही न झाल्याने नवी मुंबईकरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हा टोल नाका तयार झाल्यापासून नवी मुंबईतील नागरिक टोल भरणा करीत आहेत. या टोल वसुलीचा कार्यकाळ संपून कालावधी लोटला आहे. तसेच रस्त्याच्या उभारणी आणि देखभालीचा खर्चही वसूल झाला असताना टोल वसुली सुरूच आहे ही नवी मुंबईकरांसाठी अन्यायकारक ठरत आहे.

    नवी मुंबई हे वाढते शहर आहे. विकासकामांप्रमाणे लोकसंख्या वाढली आहे. तसेच घरटी चारचाकी वाहनांचे प्रमाणदेखील वाढत आहे. नवी मुंबई शहरात राहणारे लाखो नागरिक हे मुंबईतून स्थायिक झालेले असल्याने सातत्याने नोकरी व व्यवसायानिमित्त ते सातत्याने मुंबईत जात असतात. मात्र त्यांना सातत्याने वाशी वा ऐरोली टोल भरावा लागतो. त्यामुळे नवी मुंबईकरांना ऐरोली व वाशी टोलमधून टोलमाफी देण्यात यावी, यासाठी पुन्हा मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली असून त्याबाबत नवीन वर्षात नवी मुंबईकरांना आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

    - मंदा म्हात्रे, आमदार भाजपा, बेलापूर विधानसभा क्षेत्र

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्याने व संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना किमान नवी मुंबईतील वाहनांना टोल माफ करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.