kdmc

कल्याण डोंबिवली मनपाच्या(kalyan dombivali corporation) अभय योजनेला(abhay yojna) शेवटच्या दोन शिल्लक असताना सोमवार आणि मंगळवार दोन दिवसात तब्बल मालमत्ता थकबाकी करापोटी(pending property tax) ३६ कोटी ४४ लाख रूपये भरणा झाल्याने अभय योजना सुरू झाल्यापासून तब्बल १४९ कोटी ६ लाख रुपयाचा भरणा मनपाच्या तिजोरीत जमा झाले.

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाच्या(kalyan dombivali corporation) अभय योजनेला(abhay scheme) शेवटच्या दोन शिल्लक असताना सोमवार आणि मंगळवार दोन दिवसात तब्बल मालमत्ता थकबाकी करापोटी(pending property tax) ३६ कोटी ४४ लाख रूपये भरणा झाल्याने अभय योजना सुरू झाल्यापासून तब्बल १४९ कोटी ६लाख रुपयाचा भरणा मनपाच्या तिजोरीत जमा झाले.

कल्याण डोंबिवली मनपाने १एप्रिल २०२० ते २९ डिसेंबर २०२० पर्यंत २८५कोटी ९६लक्ष रू मनपा तिजोरीत मालमत्ता कराच्या पोटी जमा करीत विक्रमी मालमत्ता कर वसुली केली आहे. गेल्या ९ महिन्यांमध्ये कोरोना साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या करदात्यांना कर भरणे सोपे व्हावे याकरिता महापालिकेने १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत अभय योजना-२०२० लागू केली.

१५ ऑक्टोबर ते २९ डिसेंबर या अभय योजनेच्या कालावधीत नागरिकांनी रु. १४९ कोटी ०६ लक्ष इतकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत भरणा केलेली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत २१२ रु कोटी इतकी रक्कम महापालिकेकडे मालमत्ता करापोटी जमा झाली होती, अशी माहिती करनिरर्धाक संकल्क विनय कुलकर्णी यांनी दिली.

अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर,२०२० पर्यंतच आहे. या योजनेमध्ये संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराची संपूर्ण रक्कम तसेच व्याजाची २५ टक्के रक्कम एक रक्‍कमी भरल्यास, ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे. अभय योजनेस मुदत वाढ देण्यात येणार नसल्याने सर्व थकीत करदात्यांनी आपल्या मालमत्ता कराची रक्कम ३१ डिसेंबर,२०२० किंवा त्यापूर्वी जमा करुन अभय योजनेचा लाभ घ्यावा व महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. अभय योजनेला मुद्दतवाढ करावी अशी मागणी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, कल्याणपूर्व आमदार गणपत गायकवाड, कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केली असल्याने अभय योजनेला आयुक्त मुद्दतवाढ देणार का हे चित्र ३१डिसेंबर २०२० नंतर समजेल.