Traffic jam at Sheelphata; MNS's unique campaign on social media

रविवारी रात्री घोडबंदर रोडवर विचित्र अपघात(Accident On Ghodbunder Road) झाला . रविवारी रात्री टँकर (Tanker Accident) चालकाचा ताबा सुटला आणि तो एक ट्रक आणि तीन चारचाकी वांहनांवर जाऊन धडकला. यावेळी गाड्या एकमेकांवर आदळल्याने प्रवासी गाड्यांमध्ये अडकले होते. मात्र पोलिसांनी अथक परिश्रम करून दहा जणांना बाहेर काढले . या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत.  या अपघातामुळे शहरातील आणि शहराबाहेरील सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी(Traffic Jam) झाली आहे.

    ठाणे : गेल्या पंधरवड्यापासून खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी (Traffic Jam) वाढलेली असताना रविवारी रात्री घोडबंदर रोडवर विचित्र अपघात(Accident On Ghodbunder Road) झाला . रविवारी रात्री टँकर (Tanker Accident) चालकाचा ताबा सुटला आणि तो एक ट्रक आणि तीन चारचाकी वांहनांवर जाऊन धडकला. यावेळी गाड्या एकमेकांवर आदळल्याने प्रवासी गाड्यांमध्ये अडकले होते. मात्र पोलिसांनी अथक परिश्रम करून दहा जणांना बाहेर काढले . या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत.  या अपघातामुळे शहरातील आणि शहराबाहेरील सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

    बोरीवली,मीरा भाईंदर, वसई, विरार आणि अहमदाबाद महामार्गावर जाण्यासाठी ठाण्यातून घोडबंदर हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहनांची मोठी वर्दळ असते. मुळात या रस्त्याला समांतर रस्ता नसल्याने एखादी गाडी बंद पडली तर अनेक तास वाहतूककोंडी होत असते तर दुसरीकडे वाघबीळपासून चेना पुलाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो अरुंद आहे. ठाणे पालिकेच्या जकात नाक्यापासून मोठे चढन असल्याने अवजड वाहनांना ते पार करण्यासाठी बराच वेळ लागतो. याच ठिकाणी रविवारी रात्री टँकर चालकाचा ताबा सुटला आणि तो एक ट्रक आणि तीन चारचाकी वांहनांवर जाऊन धडकला. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत

    या अपघातामुळे घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या महत्वाच्या रस्त्याला समांतर रस्ता किंवा वाहतुकीचे इतर मार्ग उपलब्ध नसल्यामुळे गेल्या पंधरवड्यापासून शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढलेली असताना रविवारी रात्री घोडबंदर रोडवर झालेल्या अपघातामुळे शहरातील आणि शहराबाहेरील सर्वच रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती भयावह झाली आहे.

    टँकर बाजूला केला असला तरी टँकरमधील तेल मोठया प्रमाणात सांडले असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.रस्त्यावर पाच ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.