bhivandi transformer fire

भिवंडी(bhivandi) शहरातील कचेरी पाडा येथील मुला मुलींच्या बाल सुधारगृहाच्या भिंतीला टेकून असलेल्या टोरेंट कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला(transformer blast) आज सायंकाळी अचानक आग लागून त्याचा स्फोट झाला.

भिवंडी: भिवंडी(bhivandi) शहरातील कचेरी पाडा येथील मुला मुलींच्या बाल सुधारगृहाच्या भिंतीला टेकून असलेल्या टोरेंट कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला(transformer blast) आज सायंकाळी अचानक आग लागून त्याचा स्फोट झाला. त्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल रस्त्यावर उडाले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही माहिती अग्निशमन दलास मिळताच घटनास्थळी अग्नीशामक दलाच्या दोन गाड्या येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. तर या स्फोटामुळे बालसुधारगृहातील मुला मुलींना कोणतीही इजा अथवा हानी झाली नाही.

भिवंडीतील कचेरी पाडा येथील बालसुधार गृहाच्या भिंतीला असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने टोरेंट पॉवर कंपनीने त्वरित विद्युत प्रवाह बंद केले तर अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग विझविली. तर तेथील रस्त्यावरील वाहतूक बंद केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.