आधारवाडी कारागृहात उडाली खळबळ, २० कैद्यांना कोरोनाची लागण

कल्याण(Kalyan) येथील आधारवाडी कारागृहात २० कैद्यांना(20 Prisoners Of Adharwadi Jail) Found Corona Positive) कोरोनाची लागण झाली आहे. कारागृहात कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    ठाणे : कारागृहामध्ये कोरोनाने(Corona Update) पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कल्याण(Kalyan) येथील आधारवाडी कारागृहात २० कैद्यांना(20 Prisoners Of Adharwadi Jail) Found Corona Positive) कोरोनाची लागण झाली आहे. कारागृहात कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या कोरोनाग्रस्त कैद्यांना ठाण्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याआधीदेखील या कारागृहात तब्बल ३० कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार आधारवाडी कारागृहात काही कैद्यांची प्रकृती खालावली होती. कोरोनासदृश लक्षणं आढळल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळताच त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कैद्यांचीसुद्धा चाचणी करण्यात आली. त्यानंतर तब्बल २० रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. सध्या या कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.