दुचाकी चोरट्या टोळीचा पर्दाफाश, सराईत चोरट्यासह सहा आरोपी गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पालेगाव येथे राहणारा आरोपी दीपक सलगरे हा आपल्या लाडक्या बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने मोटरसायकल चोरी सुरू केली होती. दीपक आपल्या एका साथीदारासह महागड्या दुचाकी चोरी करायचा त्यानंतर  या गाड्या फायनान्स कंपन्यांकडून आणल्या असल्याचे भासवून  स्वस्तात दुचाकीचे आमिष दाखवून विकायचा तर, काही गाड्या भंगारवाल्याला विकायचा हा भंगारवाला दुचाकी तोडून पुढं पाठवायचा. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलं आहे.

    कल्याण : बायकोला हौस मौज करण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून महागड्या दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलीसानी अटक केली आहे. हा चोरटा बायकोला पैसे कमी पडतात म्हणून महागड्या दुचाकी चोरी करायचा आणि त्या विकायचा.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पालेगाव येथे राहणारा आरोपी दीपक सलगरे हा आपल्या लाडक्या बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने मोटरसायकल चोरी सुरू केली होती. दीपक आपल्या एका साथीदारासह महागड्या दुचाकी चोरी करायचा त्यानंतर  या गाड्या फायनान्स कंपन्यांकडून आणल्या असल्याचे भासवून  स्वस्तात दुचाकीचे आमिष दाखवून विकायचा तर, काही गाड्या भंगारवाल्याला विकायचा हा भंगारवाला दुचाकी तोडून पुढं पाठवायचा. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलं आहे.

    याबाबत बोलताना कल्याणचे डीसीपी संजय गुंजाळ म्हणाले की, ‘नागरिकांनी स्वस्त दुचाकीच्या आमिषाला बळी पडून चोरी केलेल्या गाड्या विकत  घेऊ नयेत. अन्यथा इथून पुढे अशा दुचाक्याविकत घेणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येइल.’ असा इशाराच डीसीपी गुंजाळ यांनी दिला आहे.

    कल्याण डोंबिवली परिसरातील दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पोलिस या चोरट्याच्या मागावर होते. कल्याण परिमंडळ ३ मध्ये या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी  स्वतंत्र पथके स्थापन केली होती. मानपाडा पोलिसांच्या पथकाने ज्या परिसरात दुचाकी चोरी झालेले आहेत त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहिले. तसेच भंगारांच्या दुकानांवर देखील निगराणी ठेवली. संशयितांवर बारीक नजर ठेवून पोलिसांनी दीपक सलगरे या चोरट्याला अंबरनाथ मधील पालेगाव येथे सापळा रचून अटक केली.

    दरम्यान, आरोपी दीपक विरोधात मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठल वाडी, अंबरनाथ, नारपोली, उल्हासनगर व कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.