कल्याण पूर्वेत उभे राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती स्मारक, नगरविकास विभागाकडून ५ कोटी मंजूर

ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाशेजारी उपलब्ध असणाऱ्या भूखंडावर हे स्मारक साकारण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी भूखंडाच्या आरक्षणात फेरबदल करण्यासंबंधी हरकती सूचना काढण्याचे आदेश देण्यात आलेत. नगरविकास विभागाने या पूर्णाकृती स्मारकाच्या प्रकल्पासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय.

कल्याण : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचं पूर्णाकृती स्मारक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील `ड` प्रभाग क्षेत्र कार्यालयाशेजारी उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि स्थानिक खासदार डॉ. श्रीकंत शिंदे यांच्यात ३ डिसेंबर रोजी एक बैठक झाली होती.

ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाशेजारी उपलब्ध असणाऱ्या भूखंडावर हे स्मारक साकारण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी भूखंडाच्या आरक्षणात फेरबदल करण्यासंबंधी हरकती सूचना काढण्याचे आदेश देण्यात आलेत. नगरविकास विभागाने या पूर्णाकृती स्मारकाच्या प्रकल्पासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील `ड`प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लवकरच साकारलं जाईल. त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे स्मारक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.