कंडोमऐवजी करायचे प्लॅस्टिक पिशवीचा वापर, लिंगपिसाटांनी गाठला होता क्रूरतेचा कळस

आरोपीनं फेब्रुवारीमध्ये पीडितेला फोन करून भेटायला बोलवलं. आरोपींच्या धमक्यांना घाबरुन पीडिता भेटायला गेली. तेव्हा आरोपी तिला घेऊन आणखी एका मित्राच्या घरी घेऊन गेला व तिला थंड पेयातून गुंगीचं औषध दिलं. तिने नकार दिल्याने त्याने 'तुला विना कपड्याची घरी पाठवेन' अशी धमकी दिली व पुन्हा सामूहिक बलात्कार करण्यात आला. संतापजनक बाब म्हणजे बलात्कार करत असताना आरोपींनी अनेकदा कंडोमऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केल्याचं देखील पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

    डोंबिवलीत Dombivali १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना Gang Rape In Dombivali उघडकीस आली. या घटनेमुळे फक्त डोंबिवली नाही तर महाराष्ट्र हादरला. या प्रकरणात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन आणखी धक्कादायक माहिती पुढे आलेय.

    या प्रकरणातील अल्पवयीन पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलय की, “आरोपी विजय फुके याने सर्वप्रथम 29 जानेवारी 2021 रोजी पीडितेला आपलं घर दाखवतो, असं सांगून पीडितेला मित्राच्या घरी घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं पीडितेला अश्लील व्हिडीओ दाखवून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घरातील अन्य आरोपींनी देखील पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेन सर्व आरोपींशी सर्व संपर्क तोडला आणि त्यांचे मोबाइल नंबर डिलीट केले. पण आरोपीनं पुन्हा फेब्रुवारीमध्ये पीडितेला फोन करून भेटायला बोलवू लागला. तसेच भेटायला आली नाही. तर तुझे नग्न व्हिडीओ तुझ्या आई वडिलांना दाखवेन अशी धमकीही दिली.

    आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित मुलगी पुन्हा एकदा आरोपीला भेटायला गेली. आरोपीने पीडितेला आणखी एका मित्राच्या घरी नेऊन तिला थंड पेयातून गुंगीचं औषध दिलं. पण पीडितेनं ते थंड पेय पिण्यास नकार दिल्याने त्याने ‘तुला विना कपड्याची घरी पाठवेन’ अशी धमकी दिली. यानंतर याठिकाणी देखील तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. संतापजनक बाब म्हणजे बलात्कार करत असताना आरोपींनी अनेकदा कंडोमऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केल्याचं देखील पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

    दरम्यान, शुक्रवारी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध भागांत तीन पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सोनाली ढगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष महिला पथके करत आहेत.