shivsena padadikhari sanwad vashi

जर युती झाली नसती तर नवी मुंबईत आपला आमदार असता असे वक्तव्य युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई(Varun Sardesai) यांनी केले. ते शनिवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात (Vishnudas Bhave Drama Theater)आयोजित केलेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात(Yuva Sena Meet In Vashi) बोलत होते.

  नवी मुंबई : भाजपा सरकार हे सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे ते दिसत आहे. महागाई कमी करण्याचा भाजपाचा नारा हवेत विरला आहे. आम्ही जरी ‘वॉक इंग्लिश टॉक इंग्लिश’ असलो तरी अंगातून रक्त काढलं तर ते शिवसेनेचे भगवेच असेल. आमच्या डीएनएत शिवसेना आहे. जर युती झाली नसती तर नवी मुंबईत आपला आमदार असता असे वक्तव्य युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई(Varun Sardesai) यांनी केले. ते शनिवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात (Vishnudas Bhave Drama Theater)आयोजित केलेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात(Yuva Sena Meet In Vashi) बोलत होते.

  सरदेसाई पुढे म्हणाले, कोविड काळात शिवसेनेचे कार्यकर्ते २४ तास कार्यरत होते. गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशंसनीय काम केले आहे. जनतेला ते काम भावत असून त्यामुळे येत्या सर्व निवडणुकांत शिवसेनेचा जनाधार वाढलेला दिसेल. शिवसेना हा शहरी पक्ष नसून ग्रामीण भागात देखील विस्तरलेला आहे. ग्रामपंचायतीदेखील सेनेच्या ताब्यात आलेल्या आहेत. जनता स्वतःहून ठरवते की आम्हाला शिवसेना हवी आहे. आत्ताचा काळ हा शिवसेनेसाठी सुवर्णकाळ आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी काही दिवसांत युवासेनेत प्रवेश करतील,असे भाकीत देखील त्यांनी वर्तवले.

  आपल्याला कोणी स्पर्धक ठरेल म्हणून युवासेनेच्या नेमणुका अडवू नका. आपण प्रस्थापित झाल्यावर पुढची टीम तयार करा. १८ ते ३५ वयोगटातील मतदारांना सेनेकडे आकर्षित करण्याची जबाबदारी आम्ही घेतो, शिवसेनेने ती द्यावी अशी सूचना देखील त्यांनी केली. जेव्हा जेव्हा या नाट्यगृहात सेनेचा मेळावा झाला तेव्हा शिवसेनेचा विजय झाला आहे. हा या नाट्यगृहाचा इतिहास आहे. गडचिरोलीत एका दुर्गम भागात नक्षलग्रस्त भागात युवा व युवती सेना काम करत असल्याचे पाहण्यास मिळाले. नवी मुंबई युवासेनेने वेग पकडणे आवश्यक असल्याचे सरदेसाई म्हणाले.

  यावेळी उपनेते विजय नाहटा म्हणाले की,या युवा सेनेच्या मेळाव्यातून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पक्षप्रमुखांना इच्छा नसताना ते मुख्यमंत्री झाले. मात्र देशभरात ते सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या रुपात तरुण मंत्री आपल्याला लाभले आहेत. प्रभाग रचना व आरक्षणावर आमचे बारीक लक्ष आहे. आपल्याला फायदा होईल, असेच निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. या शहरात पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. ज्या पद्धतीने राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवत आहेत. त्याच पद्धतीने नवी मुंबईत आघाडी होऊन आपण जिंकू. त्यात कोणीही कोणाला पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. सैनिकांनी काळजी करू नये.

  यावेळी माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले म्हणाले की,त्यांनी जरी बाळासाहेबांचा फोटो खाली उतरवला असला तरी सेनेचा महापौर बसताच;बाळासाहेबांचे स्मारक नवी मुंबईत उभे करू. या मेळाव्याचे फलित काय तर प्रत्येक प्रभागात युवसेनेने घरोघरी पोहोचून काम करावे. कोविडनंतरच शिवसेनेचा हा मोठा मेळावा आहे. नवी मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसेल. यावेळी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, युवासेनेचे रुपेश कदम, मेघाली राऊत, मयूर ब्रीद, चेतन नाईक, सिद्धाराम शिलवंत यांची भाषणे झाली. यावेळी सर्व माजी नगरसेवक नगरसेविका व युवासैनिक उपस्थित होते.

  भाजपा कपटी लोकांचा पक्ष
  यावेळी उपनेते विजय नाहटा यांनी भाजपावर खरपूस टीका केली. भाजपा हा सर्व उद्योग करून नामानिराळे राहणारा पक्ष आहे. मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष असून  नांदेडमध्ये निवडणुका असताना अशोक चव्हाणांच्या कारखान्यावर धाड पडली. नामर्दाचे काम भाजप करत आहे. यांना ईडी, सीबीआयची गरज लागत आहे. यांची राज्यातील ताकद संपल्याचे हे लक्षण आहे. बंगालच्या निवडणुकीत एका महिलेने भाजपला लोळवून टाकलेले जनतेने पाहिले असून आता महराष्ट्रात पालिकेत हे चित्र दिसेल अशी टीका नाहटा यांनी भाजपावर केली.

  त्यांना अनेक बाप बदलावे लागले
  यावेळी खासदार राजन विचारे यांनी नाव न घेता आमदार गणेश नाईकांवर टीका केली.  ते म्हणाले की, नवी मुंबईत पहिला महापौर शिवसेनेचा झाला. शिवसेना प्रमुखांचा फोटो त्यांनी पालिकेतून उतरवला. मात्र त्यामुळे त्यांना अनेक बाप बदलावे लागले.  ते संपूर्ण जनता आज पाहतेय अशी खोचक टीका खा. राजन विचारे यांनी आ.नाईकांचे नाव न घेता केली.