वसई: चोर समजून सहा आदिवासी महिलांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलिस निरीक्षकाचे निलंबन

पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या सहा आदिवासी महिलांना चोर समजून बेदम मारहाण केल्याप्रकणी सहायक पोलिस निरीक्षक विनोद वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे(Vasai: Police inspector suspended for beating six tribal women to death). तसेच प्रकरणाची खाते निहाय चौकशी करून यापुढील कारवाई करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

    वसई : पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या सहा आदिवासी महिलांना चोर समजून बेदम मारहाण केल्याप्रकणी सहायक पोलिस निरीक्षक विनोद वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे(Vasai: Police inspector suspended for beating six tribal women to death). तसेच प्रकरणाची खाते निहाय चौकशी करून यापुढील कारवाई करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

    पोलिसांनी काही दिवसापूर्वी सहा आदिवासी महिलांना चोर समजून त्यांना ताब्यात घेतले होते. तसेच त्यांना मारहाणदेखील केली तसेच चूक लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते.

    त्यांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलिस दफ्तरी करण्यात आली नाही, अशी माहिती आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. याच प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विनोद वाघ यांचे अखेर निलंबन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.