गावठाणाच्या घरांना मिळणार दुरुस्तीची परवानगी, मोठ्या बिल्डरांना परवानगी अन सर्वसामान्य भूमिपुत्रांना दंडुका 

गावठाण परिसरात राहणाऱ्या भूमिपुत्रांच्या घरे मोडकळीस आले आहेत. कुटुंब वाढले घर मात्र तेवढेच राहिल्याने लोकांची कुचंबना होत असल्याचा सवाल स्थायी समिती सभापती यांनी मह्सभेत चर्चेला आणला. ठाण्यात येऊर लगत असलेल्या गावात गावठाण असून भूमिपुत्रांनी घरे बांधली कि एअरफोर्स अधिकारी आणि पालिकेचे अतिक्रमण विभाग बांधकामावार कारवाई करतात.

ठाणे : ठाणे पालिकेच्या हद्दीतील गावठाणे आणि कोळीवाडे या ठिकाणी राहणाऱ्या भूमिपुत्रांना आता घराची दुरुस्तीसाठी पालिकेची परवानगी मिळणार आहे. कोलशेत भागातील गावठाण मधील घरे दुरुस्तीचा विषयावर अनेक नगरसेवकांनी बड्या बिल्डरांना इमारतीची परवानगी देता मग भूमिपुत्रांवर अन्याय का? असा सवाल उपस्थित केल्याने अखेर गावठाण मधील भूमिपुत्रांच्या घरांना पालिका सहाय्यक आयुकाताच्या मार्फत परवानगी देण्याचा ठराव महासभेत करण्यात आला.

गावठाण परिसरात राहणाऱ्या भूमिपुत्रांच्या घरे मोडकळीस आले आहेत. कुटुंब वाढले घर मात्र तेवढेच राहिल्याने लोकांची कुचंबना होत असल्याचा सवाल स्थायी समिती सभापती यांनी मह्सभेत चर्चेला आणला. ठाण्यात येऊर लगत असलेल्या गावात गावठाण असून भूमिपुत्रांनी घरे बांधली कि एअरफोर्स अधिकारी आणि पालिकेचे अतिक्रमण विभाग बांधकामावार कारवाई करतात. तर एअरफोर्सच्या १०० मीटर आसपास बांधकामास परवानगी देता येत नाही. मग लोधा, हिरानंदानी अशा बड्या बिल्डरना इमारतीच्या बांधकामांना परवानगी देता मग भूमिपुत्रांचा दोष काय? असा सवाल संजय भोईर, नाजीब्मुल्ला, जेष्ठ नगरसेवक अशोक वैती  जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी उपस्थित केला. महासभेत प्रशासनाच्या खुलाशानंतर अशोक वैती म्हणाले शहरविकास विभागाच्या अधिकारी यांनी गावठाणाच्या परवानगीबाबत खुलासच केला नाही. बड्या बिल्डरांच्या इमारातीच्या परवानगीबाबत खुलासा केला. त्यामुळे गावठाणाचा खुलास करावा अशी मागणी केली.

महासभेत दहा वर्षापूर्वी झाला होता ठराव-अंमलबजावणी नाही. गावठाण परिसरात बांधकाम दुरुस्तीसाठी अटी आणि शर्थीनुसार परवानगी देण्यात येत होती असा खुलासा करण्यात आला. कोलशेत लगतची घरे गावठाण असून त्यांचा सर्व्हे नाही. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी भरते. तरीही महापालिका परवानगी देत नाही. त्यावर महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका भूमिपुत्रांना मज्जाव करीत बडे बिल्डर यांना परवानगी देण्यात येते. राष्ट्रवादीचे हनमंत जगदाळे म्हणाले २००६ पासून हा प्रश्न प्रत्येक महासभेत उपस्थित करण्यात आला होता. २००६ साली महासभेत प्रश्न आला होता. त्यात ठाणे पालिका मध्ये ३२ गावे मार्च करण्यात आलेली आहेत. गावठाणे आणि कोळीवाडे आहेत. तब्बल दहा वर्ष महासभेत ठराव होऊन झाली. मात्र त्याची अमलबजावणीच झाली नसल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक हनमंत जगदाळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नजीबमुल्ला म्हणाले एअरफोर्स च्या नोटीफिकेशन नुसार गावठाणे हे १०० मीटरच्या हद्दीत आहेत. त्यांना घर दुरुस्तीची परवानगी मिळत नाही ती महापालिकेने द्यावी असे मत नजीबमुल्लांनी यांनी मांडले. अखेर प्रशासनाला गावठाण परिसरातील भूमिपुत्रांची घरे दुरुस्ती आणि बांधणी करण्यासाठी विविध प्रभाग समितीत असलेल्या सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत देण्यात यावी असा ठराव करण्यात आला.