शेजारी झोपू दिले नाही म्हणून नवऱ्याने दगडाने ठेचून केली बायकोची हत्या

वळ झोपू देण्यावरुन पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि संतापतलेल्या पतीने दगडाचा पाटा उचलला आणि पत्नीच्या डोक्यातच घातला. त्यात विवाहितेचा मृत्यू झाला

    मुंबई : बायको जवळ झोपू देत नाही म्हणून नवऱ्याने तिची हत्या (Husband killed wife News) केली. ही थरारक घटना मालाडमधील (Mumbai Malad News) मालवणी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दगडाचा पाटा डोक्यात घालून नवऱ्याने आपल्या बायकोचा जीव घेतला. शुक्रवारी (15 जुलै) रात्री घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. जवळ झोपू देण्यावरुन पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि संतापतलेल्या पतीने दगडाचा पाटा उचलला आणि पत्नीच्या डोक्यातच घातला. त्यात विवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीलाही अटक (Mumbai crime News) करण्यात आली. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.मालवणीतील यशोदीप को ऑपरेटीव्ह सोसायटीत शुक्रवारी रात्री धक्कादायक घटना घडली. विजयमाला ज्ञानोबा बलाडे या 48 वर्षांच्या विवाहीत महिलेचा तिच्या पतीनेच खून केला. विजयमाला ही पती ज्ञानोबा यास जवळ झोपू देत नव्हती. यावरुन दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यावेळी संतापाच्या भरात ज्ञानोबा याने दगडाचा पाड उचलला आणि विजयमालाच्या डोक्यात घातला.