Kolhapur 'A' team wins Khelo India Women's Rugby League
Kolhapur 'A' team wins Khelo India Women's Rugby League

  पुणे : रग्बी इंडिया, स्पोर्टस ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलींच्या गटात कोल्हापूर अ संघाने विजेतेपद संपादन केले.

  एकतर्फी पराभव करून विजेतेपद
  श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कोल्हापूर ‘अ’ संघाने नाशिक संघाचा ४५-०० असा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले. विजयी संघाकडून नम्रता १५, नेहा १०, तृप्ती १०, समृद्धी ५, अनुष्का ५) यांनी सुरेख कामगिरी केली.

  ठाणे ‘अ’ संघाचा ५३-०५ असा पराभव
  या आधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोल्हापूर ‘अ’ संघाने मुंबई स्टेकर्स संघाचा २४-०५ असा तर, नाशिक संघाने ठाणे ‘अ’ संघाचा २६-०५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई स्टेकर्स संघाने ठाणे ‘अ’ संघाचा ५३-०५ असा पराभव तिसरा क्रमांक पटकावला.

  स्पर्धेचे पारितोषिक वितरण क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सह संचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते झाले. सक्षिप्त निकाल : अंतिम फेरी : कोल्हापूर अ : ४५ (नम्रता १५, नेहा १०, तृप्ती १०, समृद्धी ५, अनुष्का ५) वि.वि. नाशिक: ०.

  तिसरे आणि चौथे स्थान : मुंबई स्टेकर्स : ५३ (कायरा १५, लावण्या 10, सांचल 5, रुतुजा 5) वि.वि.ठाणे अ: ५(अदिती 5).