सलग चौथ्या दिवशी कोल्हापुरात कोरोना रुग्ण वाढले, आज आणखी २ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.त्यामुळे आता नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांत वाढ

 कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.त्यामुळे आता नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांत वाढ झाली. सीपीआरमध्ये आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात इचलकरंजी येथील २३ वर्षाचा एक पुरुष आणि शाहूवाडी तालुक्यातील जांभळेवाडी येथील ३० वर्षाच्या एका रुग्णाचा समावेश आहे.या दोघांवर अनुक्रमे आयजीएम रुग्णालयात आणि सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.