दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा; निकाल ९८.५० टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board Exam) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९८.५० टक्के इतका लागला आहे. राज्यामध्ये दहावीच्या परीक्षेत कोकण विभाग हा ९९.२७ टक्केवारी घेऊन अव्वलस्थानी आहे.

    कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board Exam) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९८.५० टक्के इतका लागला आहे. राज्यामध्ये दहावीच्या परीक्षेत कोकण विभाग हा ९९.२७ टक्केवारी घेऊन अव्वलस्थानी आहे.
    नाशिक विभागाची टक्केवारी सर्वाधिक कमी म्हणजे ९५.९० टक्के इतकी आहे. राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के आहे. दरम्यान, कोल्हापूर विभागाचे सचिव डी. एस. पोवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत कोल्हापूर विभागाचा निकाल जाहीर केला.
    कोल्हापूर विभागीय मंडळातील कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातील एकूण एक लाख ३१ हजार २९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एक लाख ३० हजार ८३५ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी एक लाख २८ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्हाचा निकाल ९८. ९४ टक्के तर सातारा जिल्ह्याचा निकाल ९८ . २९ टक्के व सांगली जिल्ह्याचा ९८. १० टक्के निकाल लागला आहे. दरम्यान, कोल्हापूर विभागातील उत्तीर्ण एक लाख २८ हजार ८८४ विद्यार्थ्यांपैकी ६३ हजार ६९६ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून‌ अधिक गुण मिळवले आहेत. ८० ते ८५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार २७४ आहे. कोल्हापूर विभाग राज्यामध्ये द्वितीय स्थानी असल्याचे विभागीय सचिव पवार यांनी सांगितले.
    राज्याच्या एकूण निकालावर दृष्टिक्षेप टाकला असता पुणे विभागाचा निकाल ९६. ९६ टक्के, नागपूर विभागाचा निकाल ९७ टक्के, औरंगाबाद विभागाचा निकाल ९६.३३ टक्के, मुंबई विभागाचा निकाल ९६.९४ टक्के, कोल्हापूर विभागाचा निकाल ९८.५० टक्के, अमरावती विभागाचा निकाल ८६.८१ टक्के, नाशिक विभागाचा निकाल ९५. ९० टक्के, लातूर विभागाचा निकाल ‌९७.२७ टक्के तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९. २७ टक्के इतका आहे.