Darshan Patil of Kolhapur hit the field; First player from Maharashtra to play in European league

  Darshan Patil Club SV Gmunden Austria : कोल्हापूरने फुटबॉल जगतात महाराष्ट्राची मान उंचावण्याचे काम सातत्याने केले आहे. त्याच कोल्हापुरातील 18 वर्षांच्या दर्शन पाटीलने शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. करवीर तालुक्यातील दर्शन पाटील हा प्रतिष्ठेच्या युरोपियन लीगमध्ये खेळणारा महाराष्ट्राचा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. त्याची ऑस्ट्रियालामधील SV Gmunden फुटबॉल क्लबकडून खेळण्यासाठी निवड झाली आहे.

  युरोपियन लीगमध्ये खेळताना दिसणार

  दर्शन पाटील आता येत्या युरोपियन लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. दर्शनसह नेदरलँड्समधील वर्मन याची देखील या क्बलकडून खेळण्याची निवडला गेला आहे. दर्शन पाटील हा कोल्हापुरात देवकर पानंद येथे राहतो. त्याने मामाच्या पावलावर पाऊल ठेवत फुटबॉल खेळण्यास सुरूवात केली. तो दिल्लीत झालेल्या 14 वर्षांखालील नॅशनल स्पर्धा देखील खेळला आहे. याचबरोबर तो 19 वर्षांखालील नॅशनल स्पर्धेतदेखील खेळला होता. घरच्यांनी त्याला फुटबॉलसोबतच अभ्यासाकडेदेखील लक्ष देण्यास सांगितले.

  एक फोन आला अन्…

  दर्शनला प्रशिक्षक प्रदीप साळोखे आणि धीरज मिश्रा यांनी फोन करून महराष्ट्रात SV Gmunden ची सिलेक्शन ट्रायल होणार असल्यांच सांगितलं. पुण्यातील बालेवाडी येथे ही चाचणी पार पडली. या चाचण्यासाठी भरपूर खेळाडू आले होते. त्यातील फक्त 5 खेळाडूंची निवड झाली. यात दर्शनचा देखील समावेश होता.

  दर्शन पाटीलने व्यक्त केला उत्साह

  निवडीबाबत दर्शन म्हणाला की, मी ट्रायलवेळी माझं नाव आणि पत्ता दिला होता. त्यावेळी माझी निवड झाली आहे की नाही याची मला काहीच कल्पना नव्हती. मात्र मला माझ्या प्रशिक्षकांचा फोन आला अन् त्यांनी माझी निवड झाल्यांच सांगितलं. मी उत्साहाने पासपोर्ट काढला.

   

  मात्र त्यांच्याकडून दीड महिना झाला तरी अधिकृतरित्या कोणताच फोन आला नाही. मला वाटलं की हे सगळं फेक आहे. मात्र कौशिक सरांचा फोन आला अन् त्यांनी मुंबईला बोलवून घेतलं. मला वानखेडे स्टेडियमवर जर्सी देण्यात आली.