कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी डीएम कार्यालयात एसपी, डीएमसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घेतली बैठक

    कोल्हापूर : कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर शहरातील डीएम कार्यालयात एसपी, डीएम आणि पोलीस आणि प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.

    हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत आंदोलन
    कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. दरम्यान, याचे कारण म्हणजे कोल्हापूर शहरातील सात तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले आणि इथंच वादाची ठिणगी पडली. त्यामुळे कोल्हापूरचे वातावरण चिघळले, परंतु पोलिसांनी कडक कारवाई करीत दंगल पांगवली आहे.
    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे नागरिकांना आवाहन
    कोल्हापूरमधील तणावपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार नागरिकांना आवाहन करताना, सोशल मीडियावरच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे माध्यमांसमोर सांगितले आहे. कोल्हापूरचा सलोखा कोणीही बिघडवू नये, असे त्यांनी सांगितले आहे.