संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोपून काढले. पश्चिम भागात सुमारे सात तास सलग पाऊस झाल्याने भात, नाचणी, सोयाबीन पिके पाण्यात अडकून पडली आहेत.

    कोल्हापूर : विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोपून काढले. पश्चिम भागात सुमारे सात तास सलग पाऊस झाल्याने भात, नाचणी, सोयाबीन पिके पाण्यात अडकून पडली आहेत. हा पाऊस रब्बी पिकाला पोषक ठरला आहे. जिल्ह्यावर दुष्काळी सावट असताना तुफान पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग खुशीत आहे. मात्र सध्या ऊस तोडणी हंगामासाठी मजूर आले असल्याने मजुरांच्या झोपडीत पाणी शिरल्याने तोडणी हंगाम लांबणीवर पडणार आहे.

    बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पावसाची सुरुवात झाली त्यानंतर सात वाजता विजेच्या गडगडात जोरदार पाऊस झाला. सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सुमारे ५० मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा जोर इतका होता की अनेक भागात पाणीच पाणी झाले; तर सकल रस्त्यांना ओढयाचे स्वरूप आले. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत असताना तसेच नागरिकांना कसरत करावी लागत होती. सायंकाळी पर्यंत पाच पर्यंत पाऊस पडत राहिलेने नागरिकांनी बाहेर पडण्यास टाळले तसेच रस्त्यावरही काही अंशी वाहतूक दिसत होती अति पावसामुळे पुणे बेंगलोर महामार्ग काही तास ठप्प झाला होता. पावसामुळे काढणीस आलेले भात, सोयाबीन ही पिके सध्या पाण्याखाली अडकले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे जिल्ह्यात गेल्या आठ तासात सरासरी ५६ मिलिमीटरच्या पावसाची नोंद झाली आहे.

     ऊस तोड मजुरांच्या झोपड्यांचे नुकसान
    सर्वाधिक पाऊस राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा आदी ठिकाणी झाला आहे. कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला असल्याने कारखाना परिसरात ऊस तोड मजूर दाखल झाले आहेत. अनेकांनी आपल्या झोपड्या माळ रानावर उभ्या केल्या आहेत मात्र या पावसामुळे झोपड्यातून पाणी शिरल्याने मजुरांचे हाल झाले आहे.