कोल्हापूरमधून रोहित पवारांची सरकारवर टीका, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जी श्वेतपत्रिका काढली तेव्हा कोरा पेपर दाखवला असता तर बरं झालं असतं…

कोल्हापूरवर साहेबांचं वेगळं प्रेम आहे आणि रक्ताचं नातं आहे. ही सभा दसरा चौकात घेण्याचं खास कारण आहे. कारण आम्ही सर्वजण पुरोगामी विचाराने काम करतो.

    कोल्हापूर : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये आज रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शरद पवारांबद्दल भरभरून सांगितले. पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार म्हणाले, शरद पवार साहेबांची स्वाभिमान सभा उद्या दसरा चौकात होणार आहे. कोल्हापूरवर साहेबांचं वेगळं प्रेम आहे आणि रक्ताचं नातं आहे. ही सभा दसरा चौकात घेण्याचं खास कारण आहे. कारण आम्ही सर्वजण पुरोगामी विचाराने काम करतो. तोच विचार या पवित्र विचाराने पावन झालेल्या ठिकाणाहून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर सर्व नागरिक स्वतःच्या गाडीने, स्वखर्चाने या सभेला उपस्थित राहणार आहेत असे रोहित पवार म्हणाले.

    पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेसाठीची पहिली बैठक ही कोल्हापुरात झाली होती. लोकांच्या मनात अजूनही पवार साहेब आहेत. भाजपच्या विरोधात लढायचे आहे त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत. शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला याचा अर्थ भाजपचा आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास राहिला नाही. आतापर्यंतच्या राजकारणात पवार साहेब भाजपच्या बाजूला कधी गेले नाही. इतकंच नाही तर पवार साहेब कधीही दिल्लीसमोर झुकले नाही. सांगलीमधील लोकल नेत्यांनी काही बोललं असेल त्यात काही तथ्य नाही. पवार कुटुंबात पवार येतातच पण राष्ट्रवादी काँग्रेस हा पवार साहेब यांचं कुटुंब आहे. सुरुवातीला शरद पवार साहेब यांचा सुरुवातीला मोठा फोटो लावला होता कारण नागरिक चिडले होते असे रोहित पवार म्हणाले.

    पुढे रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांची पहिली मोठी सभा आहे, सभा तर होऊ द्या, काय टीका होते ते तर पाहू. इस्रो ही राजकीय संस्था झाली आहे. अनेक पंतप्रधानांनी त्या संस्थेला ताकद दिली आहे. चांद्रयान यशस्वी करण्यात शास्त्रज्ञांचं योगदान आहे, भाजप म्हणत आहे हे सर्व मोदींमुळे झाले म्हणतात. यामध्ये भाजप राजकारण करत आहे. किमान शास्त्रज्ञांचं नाव तरी घ्या. या यशस्वी मोहिमेचं सर्व श्रेय शास्त्रज्ञांना द्या. १९९८ मध्ये मुश्रीफ यांच्यावर विश्वास टाकावा असे अनेकांची मते नव्हती. तेव्हा म्हणाले कार्यकर्ता माझा आहे म्हणत संधी दिली, नेत्यांमुळे ताकद आहे असे नाही, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्दा महत्वाचे आहेत. अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती, आता निष्ठावंत कार्यकर्ते सांगत आहेत की, पुरोगामी विचाराने पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने लढू. काही नेत्यांनी त्या त्या नेत्यांनी पक्ष वाढू नये यासाठी प्रयत्न केला. पण आता दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे असे खोचक टीका रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

    गुजरातच्या नेत्यांना खुश करण्यात सत्ताधारी गुंतले आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाहीत. जर पुढच्या १५ दिवसांत शिक्षण भरतीची प्रक्रिया सुरू झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरले जाईल. कोल्हापुरात दोन महिन्यांपूर्वी जे घडलं ते बाहेरील नागरिकांनी घडवलं, लहान मुलं हातात दगड घेऊन उभा होता पण पोलीस बघत उभे होते. काही तरुणांनी चुकीचं घडवण्याचा प्रयत्न केला पण कोल्हापूरकरांनी मोठी दंगल होऊ दिली नाही. त्यामुळं कोल्हापूरकरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कोणत्याही राजकारणासाठी शाहू महाराजांना व्यासपीठावर आणलं जात नाही. दसरा चौक हा ऐतिहासिक चौक आहे तेथील पुरोगामी विचार महाराष्ट्राला द्यायचा आहे. एमआयडीसीमध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत. तशा तक्रारी आमच्याकडे आधी देखील आल्या होत्या आता देखील येत आहेत. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे, अशा वातावरणात नवीन कंपन्या आपल्या जिल्ह्यात येत नाहीत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जी श्वेतपत्रिका काढली त्यापेक्षा कोरा पेपर दाखवला असता तर बरं झालं असतं