कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा खंडित होणार नाही ; खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही

धावपट्टीवर सुरक्षित उतरण्यासाठी ही सिस्टीम उपयुक्त ठरणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापूर विमानतळावर नजीकच्या काळात १८० सिटर एअरबस सुविधाही उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

    कोल्हापूर : धावपट्टीवर सुरक्षित उतरण्यासाठी ही सिस्टीम उपयुक्त ठरणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापूर विमानतळावर नजीकच्या काळात १८० सिटर एअरबस सुविधाही उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

    कमी प्रवासी संख्या असल्याचे कारण सांगत कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा १४ डिसेंबरनंतर खंडित करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचाही खुलासा खासदार महाडिक यांनी केला. कोल्हापूर-तिरुपती ही हवाई सेवा खंडित होणार नाही, यासाठी आपण केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे प्रयत्न करत आहोत. इतकेच नव्हे तर नांदेड, नागपूर, इंदोर, गोवा या मार्गावर हवाई सेवा सुरु करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या बंद असणारी कोल्हापूर-अहमदाबाद हवाईसेवा जानेवारी अखेरपर्यंत सुरु होईल, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.यावेळी प्रोजेक्ट इंजिनिअर प्रशांत वैद्य, सरव्यवस्थापक किशनकुमार, इलेक्ट्रीकल इनचार्ज प्रकाश डुबल, नियंत्रण कक्ष अधिकारी राजेश अस्थाना, सिध्दार्थ भस्मे, कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, रावसाहेब माने उपस्थित होते.

    रस्त्यांची उंची वाढवावी
    कोल्हापूर विमानतळाला उजळाईवाडी परिसरातून जोडणाऱ्या रस्त्यांची उंची वाढवावी, ही ग्रामस्थांची मागणी रास्तच आहे. आपण या मागणीशी सहमत आहे. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत ग्रामस्थांची मागणी मान्य होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.