
दिवाळीसाठी यापूर्वीच एलटीटी मेंगलोर एलटीटी साप्ताहीक आणि एलटीटी - थिविम – एलटीटी त्रिसाप्ताहीक अशा दोन विशेष गाड्या रेल्वे प्रशासनाने सोडल्या आहेत.
सिंधुदुर्ग : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे कोकण रेल्वे मार्गावर उधना – मेंगलोर – उधना – द्विसाप्ताहीक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीसाठी यापूर्वीच एलटीटी मेंगलोर एलटीटी साप्ताहीक आणि एलटीटी – थिविम – एलटीटी त्रिसाप्ताहीक अशा दोन विशेष गाड्या रेल्वे प्रशासनाने सोडल्या आहेत. यापैकी काही गाड्या नियमित कराव्यात, आता आणखी एका गाडीची घोषणा झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. उधना मेंगलोर ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवार, रविवारी सायंकाळी ७.४५ वा. उधना येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.१० वा. मेंगलोर येथे पोहोचेल.
मेंगलोर उधना ४ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत दर शनिवार, सोमवारी रात्री ९.१० वा. मेंगलोर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वा. उधना येथे पोहोचेल. गाडीला वापी, पालघर, वसई, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी, मडगांव, कारवार, अंकोला, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, कुंदापुरा, उडुपी, मुलकी, सुरतकल आदी स्थानकांवर थांबा असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या नव्याने सोडण्यात येणाऱ्या एलटीटी मडगाव मेंगलोर एलटीटी थीवीम या गाड्यांपैकी एल .टी .टी मडगाव, जनशताब्दी नेत्रावती सह काही गाड्या कुडाळ कणकवली प्रमाणे सिधुदर्ग स्टेशनवर थांबे नियमित कराव्यात कोकण कन्या, मांडवी व अन्य गाड्यांवर येणारा प्रवासी भारमान कमी होऊ शकेल याबाबतही कोकणरेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.